भारतीय क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्मृती अनेक काळापासून पलाश मुच्छलला डेट करत आहे.
स्मृती मानधना इंदौरची सूनबाई होणार आहे. स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छल आता 30 वर्षांचा आहे.
स्मृतीचा होणारा नवरा म्युजिशियन आणि चित्रपट निर्माता आहे. त्याचे बॉलिवूडसोबत खास कनेक्शन आहे. पलाश मुच्छलचे इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.
पलाश मुच्छलने 2014 साली रिलीज झालेल्या 'ढिश्कियाऊं' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. तो एक उत्तम लेखक देखील आहे.
पलाश मुच्छलचे मुंबईत आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. आजवर पलाशने अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत.
2024 मध्ये त्याचा 'काम चालू है' चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट 19 एप्रिलला 2024 मध्ये रिलीज झाला. यात अभिनेता राजपाल यादव मुख्य भूमिकेत होता.
मीडिया रिपोर्टनुसार, पलाश मुच्छलची एकूण संपत्ती अंदाजे 20 ते 41 कोटींच्या आसपास आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, स्मृती मानधानाची एकूण संपत्ती 32 ते 34 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तिने आजवर आपल्या खेळाने भारताचे नाव मोठे केले आहे.