दिवाळीनिमित्त कार कंपन्या ग्राहकांना मोठ-मोठ्या ऑफर देत आहेत. त्यात अनेक कंपन्या कॅश डिस्काऊंट देत आहेत. कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि बोनसच्या नावावर कंपन्या कारवर जबरदस्त ऑफर देत आहेत. परंतू तुम्हाला माहिती आहे का ऑटो कंपन्या दिवाळीच्या वेळीच का अखेर डिस्काऊंटचा पाऊस पाडतात. जर तुम्हाला यासंदर्भात सत्य माहिती पडले तर मोठी हैराणी आहे. कारण ऑटो कंपन्यांकडून मिळणारे डिस्काऊंट ही धुळफेक तर नाही ना असा सवाल केला जात आहे.
दिवाळीच्या निमित्ताने कार कंपन्या त्यांच्या कारवर दोन ते तीन लाख रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहेत, ज्यात कंपन्या हॅचबॅक, सेडान, एसयुव्ही आणि कूपे मॉडेलवर डिस्काऊंट ऑफर देत आहेत. आता मारुती, हुंडई, होंडा, महिंद्र आणि टाटा सह सर्व कंपन्या अशाच डिस्काऊंट ऑफर देत आहेत. परंतू तुम्हाला वाटते की हे डिस्काऊंट ऑफर तुमच्यासाठी या ऑफर फायद्याचा सौदा आहेत का ? या संदर्भात आपण विस्ताराने माहिती घेऊयात…
दिवाळी दरवर्षी ऑक्टोबर वा नोव्हेंबर महिन्यात येत असते. यानंतर डिसेंबर महिना येत आहे आणि वर्ष संपत आहेत. वास्तविक कोणतीही व्यक्ती जेव्हा कार खरेदी करते तेव्हा आधी मॉडेल कोणते घ्यायचे याचा विचार घेतो. उदाहरणासाठी घ्यायचे झाले तर समजा तुम्ही जानेवारी वा फेब्रुवारी २०२६ रोजी कार खरेदी करायचे असेल तेव्हा तुम्हाला २०२५ चे मॉडेल दिले तर तुम्ही घेणार नाही. मोटार व्हेईकल एक्टनुसार देशात पेट्रोल कार १५ वर्षांसाठी आणि डिझेल कार १० वर्षांसाठी व्हॅलिड असते. अशात जर तुम्ही २०२६ मध्ये २०२५ चे मॉडेल खरेदी कराल तर आपोआप या कारची लाईफ एक वर्षे कमी होते. असा ऑटो कंपन्या दिवाळीच्या वेळी डिस्काऊंट देऊन आपला जुना स्टॉक कमी करण्याचा प्रयत्न करत असते.