चिखलदरा : मेळघाटमध्ये अघोरी पद्धतीने उपचार करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. चिखलदरा तालुक्यातील लाखेवाडा या आदिवासीबहुल गावामध्ये अवघ्या २३ दिवसाच्या बाळाच्या पोटावर उदबत्तीने चटके दिल्याची घटना उघडकीस आली.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवागावातील आशा वर्कर जिजी भोगेलाल सावलकर (वय ४०) यांच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरुद्ध चिखलदरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेची नुकतीच प्रसूती होऊन तिने एका अपत्याला जन्म दिला. बाळाचे सध्याचे वय तेवीस दिवसांचे आहे. मागील काही दिवसांपासून बाळाचे पोट फुगून दुखत असल्यामुळे त्याला उलट्यांचा त्रास सुरू होता.
त्यामुळे त्याची प्रकृती बरी व्हावी या उद्देशाने महिलेने बाळाला रुग्णालयात नेऊन उपचार करण्याऐवजी अघोरी पद्धतीने उपचार करण्याचे ठरवून उदबत्तीने बाळाला पोटावर चटक दिले. त्यात बाळ जखमी झाले. याप्रकरणी सावलकर यांच्या तक्रारीवरून संशयित महिलेविरुद्ध जुन्या चालीरीती रूढी परंपरेनुसार अघोरी इलाज केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला शनिवारपर्यंत (ता. १८) अटक करण्यात आली नसल्याचे चिखलदरा पोलिसांनी सांगितले.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात! वर्षातील चौथी घटनाअशा पद्धतीच्या घटना मेळघाटात वारंवार घडत आहे. शासकीय पातळीवरून जनजागृती करण्यात येत असली तरी त्यात फारसा फरक जाणवत नाही. लहान बाळांच्या पोटावर सळईने किंवा उदबत्तीने उपचार करण्याच्या नावाखाली चटके देण्याची ही या वर्षातील चौथी घटना आहे. या घटने संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांसह स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना या घटनेची माहिती नव्हती.