Virat Kohli: भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विराट कोहलीचे उत्तर, बरंच काही बोलून गेला! पाहा शास्त्री-गिलख्रिस्टने घेतलेली मुलाखत Video
esakal October 20, 2025 01:45 AM

Virat Kohli’s Subtle Response to Future Speculation : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली७ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या वन डे सामन्यात विराटला ८ चेंडूंत शून्य धावांवर माघारी परतावे लागले, परंतु भारतासाठी खेळण्याची त्याची भूक अजून संपलेली नाही. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट ५-६ महिने कुटुंबियांसोबत लंडनमध्ये होता आणि तो टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाला. विराट २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप खेळणार की नाही? हा प्रश्न सध्या सर्वांना सतावतोय.

तो म्हणाला, ऑस्ट्रेलियात खेळणे आवडते.. मी इथे क्रिकेट खेळणे एन्जॉय केले आणि इथे सुरुवातीला तुम्हाला चाहत्यांकडून टीका सहन करावी लागते, परंतु ते तेवढा आदरही तुम्हाला देतात. इथे अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत, असे विराट कोहलीने सांगितले.

IND vs AUS 1st ODI Live: २५ धावांत ३ विकेट्स! विराट कोहलीला 'गंडवलं', भोपळ्यावर माघारी पाठवलं; शुभमन गिलही परतला Video

विराट कोहलीने २०१० नंतर पदार्पण केल्यापासून ५३५ आंतरारष्ट्रीय सामने आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील २३८ सामने खेळले आहेत. अॅडम गिलख्रिस्टने तू मागील ५-६ महिने लंडनमध्ये आहेस, काय सांगशील? विराट म्हणाला, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मी तिथे आहे. मी आयुष्य जगतोय.. मी मागील बरीच वर्ष, किती ते सांगता येणार नाही, परंतु असं आयुष्य जगू शकलो नाही. या कालावधीत मी मुलांसोबत, कुटुंबियांसोबत वेळ घालवला आणि हा आयुष्यातील खूप सुंदर क्षण होता.

तू दोन फॉरमॅटमधून निवृत्त झाला आहेत आणि आता फक्त वन डे क्रिकेट खेळतोय, तुझी तयारी कशी सुरू आहे? रवी शास्त्री यांनी विचारलेल्या प्रश्नावर विराट म्हणाला, मागील १५-२० वर्ष मी जेवढं क्रिकेट खेळलोय, मी खरं सांगायचं तर मी आराम केलेला नाही. मी मागील १५ वर्षांत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्यात आयपीएलच्या सामन्यांचाही समावेश केला आहे. त्यामुळे आता बऱ्याच विश्रांतीनंतर मी मैदानावर उतरलो आहे. ताजेतवाने होण्यासाठीचा हा सुट्टीचा काळ होता. मला पूर्वीपेक्षा जास्त तंदुरुस्त वाटत आहे.

विराटने भारतासाठी १२३ कसोटी सामन्यांत ३० शतकं व ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० मध्ये १२५ सामन्यांत ४८.६९ च्या सरासरीने त्याने सर्वाधिक ४१८८ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये विराटने ३०२ सामन्यांत ५७.८८च्या सरासरीने १४१८१ धावा केल्या आहेत. वन डेत सर्वाधिक ५१ शतकांचा विक्रम विराटच्या नावावर आहे आणि त्याने ७४ अर्धशतकं झळकावली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.