भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना पर्थच्य ऑप्टस मैदानात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 7 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना भारतीय संघाची दाणादाण उडाली. हासामना पावसाच्या व्यत्ययामुळे 26 षटकांचा करावा लागला. मिचेल स्टार्कने यात 6 षटकं टाकली. त्यातलं एक षटक निर्धाव टाकलं आणि एक गडी बाद केला. त्याचा एक बळी विराट कोहली होता हे विशेष.. त्याला खातंही खोलू दिलं नाही. पण या सामन्यात मिचेल स्टार्कने टाकलेला पहिला चेंडू वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कारण रोहित शर्माने पहिला चेंडूचा सामना केला तेव्हा त्याचा वेग हा 176.5 किमी प्रति तास इतका होता. यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. शोएब अख्तरचा विक्रम मोडला असं सांगण्यात आलं. अनेकांना तर या चर्चांवर विश्वासच बसला नाही. कारण तसं मिचेल स्टार्ककडून शक्य होणं कठीणच आहे. त्यामुळे शहनिशा सुरु झाली.
सोशल मीडियावरील चर्चेमागचं सत्य काय?मिचेल स्टार्कने पहिला चेंडू टाकला तेव्हा त्याच्यासमोर 176.5 किमी प्रति तास असं लिहून आलं. हा स्क्रिनशॉन वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. काही जणांनी तर शोएब अख्तरचा 22 वर्षे जुना विक्रम मोडला असंही लिहिलं आहे. लाईव्ह सामन्यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चुकून 176.5 किमी प्रति तास असं दाखवलं गेलं. पण क्रिकबजने आपल्या समालोचनात चेंडूचा वेग हा 140.8 किमी प्रतितास इतका दाखवला. त्यामुळे ही बाब चुकून झाली आहे. अन्यथा हा रेकॉर्ड मोडला असता तर समालोचकांनी स्वत: या विक्रमाची नोंद घेतली असती. तसेच चर्चा केली असती. यापूर्वीही अशी प्रकरणं समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे असं अनेकदा घडलं आहे.
Mitchell Starc breaks Shoaib Akhtar’s 22 year old record for the fastest delivery in cricket history! 🙂 pic.twitter.com/ah5pRGi2TK
— 𝘚. 𝘏𝘢𝘴𝘩𝘪𝘳 (@Hashir_63)
Mitchell Starc breaks Shoaib Akhtar’s 22-year-old record for the fastest delivery in cricket history! 👀
● Shoaib Akhtar’s fastest delivery:
161.3 km/h (100.23 mph)
● Mitchell Starc’s first ball vs India:
176.5 km/h (109 mph)#INDvsAUS #FastestDelivery pic.twitter.com/PMkBv3A4aM— ABD (@FAheemAli_14)
जगभरात वेगाचा बादशाह म्हणून पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं नाव घेतलं जातं. पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने 161.3 किमी प्रति तासाने चेंडू टाकला होता. हा चेंडू त्याने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टाकला होता. त्यानंतर अजूपर्यंत या विक्रमाच्या आसपास कोणी पोहोचू शकलं नाही. त्यामुळे हा विक्रम अबाधित आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने 161.1 प्रतितासाने चेंडू टाकला आहे. मिचेल स्टार्कचा सर्वात वेगाने चेंडू हा 160.4 किमी प्रतितास आहे. भारताचा एकही गोलंदाज टॉप 10 मध्ये नाही.