सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिवाळीच्या निमित्ताने नवीन दुचाकी, चार चाकी व व्यावसायिक जेसीबी, पोकलेन वाहन खरेदीच्या वेगवेगळ्या कर्ज योजना, तसेच केंद्र शासनाकडून घरगुती विजेसाठी पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजना सुरू केली आहे. यामध्ये सौर ऊर्जा यंत्रासाठी ३० ते ७८ हजार रुपये इतके अनुदान उपलब्ध होणार आहे. अशी सौर संयंत्र बसविण्यास जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा केला जात आहे.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवाजिल्हा बँकेने सौर ऊर्जा संयंत्र कर्ज योजनेबरोबरच इतर केंद्र व राज्य सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या व्याज परतावा व अनुदान योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीन पाटील यांनी केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, तसेच पगारदार व्यक्तीचे आर्थिक पतमान उंचविण्यासाठी विविध कर्ज धोरणांद्वारे कर्ज पुरवठा करून सर्व घटकांच्या विकासासाठी नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. बँकेने कर्ज पुरवठा करताना केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध व्याज परतावा व अनुदान योजनांची जोड दिल्याने याचा कर्जदारांचा फायदा होत आहे. यामध्ये मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळान्वये कर्जाच्या नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांस ‘शून्य’ टक्के दराने, तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कृत विविध जाती धर्मांसाठी अस्तित्वात असलेल्या सर्व महामंडळाच्या लाभार्थ्यांना बँकेच्या कर्जामध्ये लाभ मिळवून देण्यास बँक नेहमीच प्रयत्नशील आहे.
बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजेंद्र भिलारे यांनी नजीकच्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने सर्व प्रकारची नवीन वाहने, तसेच फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांना त्वरित कर्ज मंजुरी देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. बँकेने संचालक मंडळाच्या संकल्पनेतून लहान व्यावसायिकांना अमृत आधार कर्ज योजना कार्यान्वित केली असून, या योजनेसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत अनुदान प्राप्त होत असल्याने सर्वसामान्य नवीन लघुउद्योजकांचे आर्थिक पतमान उंचविले आहे. यासाठी किफायतशीर व्याजदर व सुलभ कर्जपुरवठा याचा लाभ घेऊन स्वतःबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्राहकांनी बँकेचा विविध ठेव व कर्ज योजनांसाठी, तसेच दिवाळी सणानिमित्त आपल्या विविध स्वप्नांना साकार करण्यासाठी बँकेच्या नजीकच्या शाखेत भेट देण्याचे आवाहन सरव्यवस्थापक राजीव गाढवे यांनी केले आहे.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत २५ ते ३५ टक्केपर्यंत अनुदानित कर्ज योजना, विविध व्यवसायासाठी तीन कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, पगारदार नोकरांसाठी सॅलरी पॅकेज कर्ज योजना, गृहसंकल्पपूर्ती कर्ज योजनांचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांना आकार द्यावा.
- डॉ. राजेंद्र सरकाळे. मुख्य कार्यकारी अधिकारी,
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.