शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्राकडून मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा, इतके कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर
Tv9 Marathi October 20, 2025 10:45 AM

मान्सून काळात परतीच्या पावसादरम्यान मराठवाडा आणि सोलापूर भागात शेतकऱ्यांचे शेतीचे पुराने मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य सरकारने 2,215 कोटीची मदत जाहीर केली होती. आता केंद्र सरकारने राज्य सरकारला शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारला एसडीआरएफच्या केंद्रीय हिश्शांचा दुसरा हप्ता म्हणून 1,950.80 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यंदा मान्सून आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून या राज्यांना आर्थिक मदत म्हणून 1,950.80 रुपये मंजूर केले असून त्यातील कर्नाटकसाठी 384.40 कोटी रुपये आणि महाराष्ट्रासाठी 1,566.40 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 2025-26 या वर्षासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारांना एसडीआरएफच्या केंद्रीय हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून 1,950.80 कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली आहे. या वर्षी नैऋत्य मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी या राज्यांना मदत करण्यासाठी 1,950.80 कोटी रुपयांच्या एकूण रकमेपैकी 384.40 कोटी रुपये कर्नाटकसाठी आणि 1,566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत.

येथे पोस्ट पाहा –

मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांचा मी नितांत आभारी आहे.
ही अग्रिम… pic.twitter.com/DauerB5kEw

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्या ते म्हणतात की मान्सूनच्या काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल मदत म्हणून केंद्र सरकारने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह यांचा मी नितांत आभारी आहे. ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.