लोणावळा, ता.१९ : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन विद्यार्थिनींचे शैक्षणिक शुल्क भरून शंकरबन प्रतिष्ठानने मदतीचा हात दिला. या दोघी बहिणी डॉ. बी. एन पुरंदरे हायस्कूलमध्ये शिकत आहेत. त्यांचा सांभाळ त्यांची आजी करीत आहे. या विद्यार्थिनींच्या अडचणीची माहिती मिळताच प्रतिष्ठानने मागील वर्षीपासून ही मदत सुरू केली आहे. या वर्षी हे शुल्क शाळेकडे सोपविताना याप्रसंगी शंकरबन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू निकम, विश्वस्त अनंता टेमघरे, सुनील दळवी, जान्हवी कसबेकर, प्रभाकर भालेकर, विशाल जाधव, संतोष दाभाडे, शंकर दळवी, संदीप चव्हाण, गणेश धामणस्कर, राजाराम बिरांजे, नंदुभाऊ वर्तक, धर्मेंद्र डुंबरे आदी उपस्थित होते.