एका रुग्णाचा पक्षाघातामुळे आवाज गेला होता. या रुग्णाच्या डाव्या बादूला व्होकल कॉर्ड ( स्वर-तंतू ) पॅरालिसिसची समस्या होती. एका व्हायरल फिव्हरने ही समस्या निर्माण झाली होती. त्याने सहा महिने अनेक डॉक्टरांकडून उपचार केला परंतू काही फरक पडला नव्हता. त्याची नोकरी जाण्याची वेळ आली आणि त्यामुळे कुटुंब अडचणीत आले. अखेर फरीदाबादच्या सेक्टर ८ येथील सर्वोदय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला आशा दाखवली. येथे त्या रुग्णावर अतिशय दुर्मिळ अशी लॅरिंजियल रि- इनर्वेशन सर्जरी केली.
ही सर्जरी उत्तर भारतात पहिल्यांदाच झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला असून डॉक्टरांनी ही सर्जरी यशस्वीपणे केली. सर्वोदय हॉस्पिटलच्या ईएनटी आणि कॉक्लियर इम्प्लांट विभागाचे संचालक डॉ. रवि भाटीया आणि असोसिएट कन्सलटन्ट डॉ. आकाश अग्रवाल यांच्या टीमने ही सर्जरी केली आणि यश मिळाले.
व्होकल कॉर्डच्या नसेला जोडले गेलेडॉ. आकाश अग्रवाल यांनी या सर्जरी संदर्भात सांगितले की या सर्जरीत व्होकल कॉर्डला पुरवठा करणारी नस, जी क्षतिग्रस्त झाली होती. त्या नसेल मायक्रोस्कोपने ऑपरेशन दरम्यान पुन्हा जोडण्यात आले. हे तंत्र उत्तर भारतात प्रथमच वापरलेले गेले. सर्जरीनंतर रिकव्हरीसाठी रुग्णाला वॉईस थेरेपी, रेजोनेन्स थेरेपी, स्वॉलोईंग थिरपी दिली गेली आणि २ ते ३ आठवड्यात एंडोस्कोपी देखील केली गेली. सर्जरीनंतर केवळ दोन महिन्यानंतर रुग्णाचा आवाज पूर्णपणे सामान्य झाला. आता तो नेहमीप्रमाणे त्याचे आयुष्य जगू शकणार आहे.
कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची आवाजच त्याची ओळख असते. हे यश अशा रुग्णांसाठी मोठा आशेचा किरण आहे, ज्यांचा आवाज काही कारणाने हरवला आहे. सर्वोदय हॉस्पिटलचे हे पाऊल ENT आणि वॉईस केअरमध्ये एक नवा अध्याय लिहिणार आहे. याबरोबरच डॉ. आकास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली सर्वोदय हॉस्पिटल कॅन्सर, स्ट्रोक, वॉईस पॅरालिसिस, आणि अन्य रुग्णांसाठी स्पीच, स्वॉलोईंग तसेच श्वसनाच्या संबंधित समस्यांसाठी एक नवा विभाग सुरु केला आहे.
सर्वोदयचे ENT तसेच कॉक्लिअर इम्प्लांट विभागाचे संचालक डॉ.रवी भाटीया यांनी सांगितले की सर्वोदयमध्ये नेहमची लोकांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न होत असतो, ज्यामुळे रुग्णांना उपचारासाठी दूर जावे लागणार नाही आणि त्यांना येथे जागतिक स्तरिय उपचार कमी पैशात मिळणार आहे.
आमच्या अत्याधुनिक ENT तसेच कॉकलियर इम्प्लांट सेंटर आधुनिक साधनांनी सुसज्ज आहे. येथे ईएनटी सर्जन, स्पीच थेरेपिस्ट, वेस्टीबुलर फिजिकल थेरेपिस्ट, ऑडिटरी-व्हर्बल उपचार तज्ज्ञ आणि ऑडिओलॉजिस्टची अनुभवी टीम उपलब्ध आहे. येथे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या कान, नाक तसेच गळ्याच्या समस्यांवर उपचार उपलब्ध आहेत.