भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे.
या दौऱ्यापूर्वी रोहितने ११ किलो वजन कमी केले अहे.
त्याने वजन कमी करण्यामागे किती मेहनत घेतली आणि काय केलं, याबाबत अभिषेक नायरचे खुलासा केला.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात झाली असून रविवारी (१९ ऑक्टोबर) पर्थमध्ये होत असलेल्या पहिल्या वनडे सामन्यातून माजी कर्णधार रोहित शर्मा अणि विराट कोहली यांचेही भारताच्या संघात पुनरागमन झाले आहे. त्यांच्या पुनरागमनासोबतच एका गोष्टींची सध्या चर्चा आहे, ती गोष्ट म्हणजे रोहितचा फिटनेस.
रोहितने गेल्या तीन-चार महिन्यातच तब्बल ११ किलो वजन कमी केलं आहे. यामागे सर्वात मोठे योगदान राहिले ते, त्याचा जवळचा मित्र, माजी संघसहकारी आणि भारतीय संघाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचे.
रोहितने गेल्या काही महिन्यात अभिषेक नायरसोबत त्याच्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. आता याबाबात अभिषेक नायरने आता खुलासा केला आहे. त्याने असंही सांगितलं की रोहितने त्याला आवडणारा वडापाव खाणंही सोडलं आहे.
Rohit Sharma Video: श्रेयस अय्यरने पुरस्काराची ट्रॉफी खाली ठेवली अन् हिटमॅनने पाहाताच जे केलं, त्यानं मनं जिंकलीनायर जिओ हॉटस्टारशी बोलताना म्हणाला, 'थोडक्यात सांगायचं झालं, तर रोज तीन तासांची ट्रेनिंग होती. आम्ही खूप कार्डिओ केला नाही. पहिल्या पाच आठवड्यात बॉडीबिल्डरसारखी मानसिकता होती. त्यावेळी प्रयत्न फक्त सडपातळ होण्याचा होता. ज्यामध्ये तो बॉडीबिल्डरप्रमाणे रिपिटेशन्स करायचा'
'अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले, अगदी भारतीय संघाचा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच ऍड्रियन ले रुक्सलाही. पण तो शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी ७००-८०० वेळा रिपिटेशन करायचा. कल्पना करा, तुम्ही फक्त छाती किंवा ट्रायसेप्ससाठी ८०० वेळा रिपिटेशन्स करत आहात.'
'हलक्या वजनांसोबत आम्ही खुपदा रिपिटेशन्स करत होतो. यामागे ताकद आणि सहनशक्ती वाढवण्याचं लक्ष्य होतं. त्यासोबत प्रत्येक सेशनच्या शेवटी आम्ही साधारण १५ - २० मिनिटे क्रॉस फिट करायचो, जे अधिक कार्डिओ आण हालचालींवर अधारित होतं. आठवड्यातील सहा दिवस, दररोज तीन तास, सलग तीन महिने न थांबता, सातत्याने हे सुरू होतं.'
याशिवाय अभिषेक नायरने रोहितच्या बदललेल्या डाएटबाबतही सांगितले. तो म्हणाला, 'सर्व फक्त ट्रेनिंगवर थांबलं नव्हतं. त्यानंतर त्याच्या खाण्याच्या सवयीही नियंत्रणात आणण्यात आल्या. खरंतर ही त्याची वचनबद्धता होती की घरी गेल्यानंतर तो प्रसिद्ध वडापाव आणि ज्या गोष्टींबद्दल लोकं बोलतात, हे काहीच खाणार नाही. ही त्याची वचनबद्धता होती. ट्रेनिंगची तीन तास तेव्हाच फायदेशीर ठरणार होते, जेव्हा उरलेल्या २१ तासात तो स्वत:वर नियंत्रण ठेवेल. त्याची हीच मानसिकता होती.'
पहिले ८ आठवणे पूर्णपणे ट्रेनिंगवर लक्ष्य असल्याचे नायरने सांगितले. तसेच तो म्हणाला, त्यानंतर कौशल्यावरही भार दिला. नायरने सांगितले, 'नंतर आम्ही झालेल्या बदलांनंतर त्याच्या हालचाली कशा होतात, हे पाहिले. बॉडिबिल्डरपासून खेळाडू बनण्यासाठीही बरीच मेहनत होती. जी नंतरच्या आठवड्यात करण्यात आली.'
'जेव्हा आम्ही पहिल्यांदा सराव केला, तेव्हा त्याने बचावात्मक शॉट खेळला. त्यादिवशी त्याच्यासमोर असं चित्र ठेवलं होतं की मार आणि पळ. जेव्हा तो नॉन-स्ट्रायकर एन्डला पोहचला, तो म्हणाला, 'भाई मी तर उडतोय'. त्याच्याकडून हिच प्रतिक्रिया आली. बराच दिवसांनंतर त्याला इतकं हलकं वाटत होतं.'
नायरने खुलासा केला की रोहितने विमानतळावरील त्याचा फोटो पाहिला, ज्यामुळे त्याला बदल करण्याची इच्छा झाली. नायरने सांगितले, 'रोहितने २०११ मध्येही अशाप्रकारे बदल घडवला होता. त्याआधी त्याने पेपरमधील त्याचा एक फोटो पाहिला होता. सोशल मीडियावर त्याची प्रतिमा कशी आहे, याबाबत तो खूप जागरुक आहे. जर त्याच्या पोटावर वर्तुळ किंवा बाण दाखवलेला केलेला फोटो समोर आला तर, त्यामुळे त्याला प्रेरणा मिळाली.'
'आयपीएलनंतर तो एका सुट्टीवरून परत आल्यानंतर त्याचा असा फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये असा दावा केलेला की त्याचं वजन वाढलंय. त्यानंतर चर्चा फक्त आपण काय करायला हवं, यावर झाली.'
'हो आम्हाला त्याला क्रिकेटसाठी फिट तर करायचेच होते, पण त्यासोबत लोकं रोहितकडे पाहून काय म्हणतील, याचाही विचार होता. नक्कीच त्याला त्याची कारकिर्दी दीर्घकाळासाठी टिकवायचीआहे आणि २०२७ वर्ल्ड कपपर्यंत न्यायची आहे. त्यामुळे पहिले उद्दिष्ट हे त्याची शरीरयष्टी बदलणं होतं.'
'Rohit Sharma, विराट कोहली मागील १०-१५ वर्ष खेळत आहेत, आता...'; शुभमन गिल हे असं का म्हणाला? गंभीरच्या विधानानंतर भाई सुटला...नायरने पुढे सांगितलं 'आम्ही सुरुवातीला १० किलो वजन कमी करण्याचं ठरवलं होतं, पण मला त्याबद्दलही खात्री नव्हती की तो इतकं वजन कमी करेल. आम्ही मनात एक लक्ष्य ठेवून सुरुवात केली होती. पण आम्हाला ट्रेनिंग आणि आहारात सातत्य हवं होतं. जेव्हा तुम्ही मध्ये स्पर्धा खेळता, तेव्हा सातत्य राहत नाही. पण आमच्याकडे कोणत्याही अडथळ्याशिवाय तीन महिने होते. पण तीन महिन्यात जे झालं, ते सहा महिन्यातही तसं झालं नसतं.'