कास : मी दिल्लीत जावे अथवा गावाकडे, अनेकांची पोटदुखी सुरू होते. अशांचा मी विचार करत नाही. पोटदुखीवाल्यांची व्यवस्था आम्ही केली असून, त्यांच्यासाठी मोफत ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी दरे गावातील शिवारात फेरफटका मारला. त्या वेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘विरोधकांकडे सध्या मुद्दाच नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज करेन, याची त्यांनी कल्पना केली नव्हती. मी दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची ‘दिवाळी काळी’ होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले.’’
विरोधक मुद्दा नसल्यामुळे दिशाभूल करत आहेत. जर चांगला निर्णय घेतला तर त्याला चांगले म्हटले पाहिजे. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन चांगले मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत होते. आता मात्र मुख्यमंत्री कसे अपयशी आहेत, हे सांगत सुटले आहेत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. हे त्यांचे कायमचे रडगाणे आहे, असा चिमटाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काढला.
‘कृषी पर्यटन वाढेल’
इथला माणूस नोकरीसाठी मुंबई- ठाण्यात जातो. त्याला गाव सोडावे लागू नये, यासाठी शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास कृषी पर्यटनही वाढू लागेल. मुनावळे येथे पर्यटन प्रकल्प सुरू होत आहे. वॉटर स्पोर्ट होत आहे. कोकण- सातारा जोडणारा पूल तयार होत आहे. पुढच्या महिन्यात कोयना बॅक वॉटरला फेस्टिव्हल घेण्याचेही नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवा ‘सफरचंदाची शेतीही शक्य’सफरचंदाची शेती आपल्या भागात होऊ शकते. येथील हवामान, पाणी, माती त्याला पोषक आहे. या भागातील लोकांना नावीन्यपूर्ण शेती करता येईल, गटशेतीच्या माध्यमातून एकत्र आणता येईल. याठिकाणी जांभूळ, आवळा, फणस, आंबा, काजू अशी सर्व प्रकारचे फळे येतात. कॉफी, केशर, चहा, हळदही पिकवली जाऊ शकते. स्ट्रॉबेरीलाही पोषक हवामान आहे.