Donald Trump Ban On Colombia : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही. अमेरिका फस्ट या धोरणाअंतर्गत त्यांनी जगाला थक्क करून टाकरणारे काही टोकाचे निर्णय घेतले आहेत. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी यूएस आर्मीने कॅरेबियन सागरातून ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेन सैन्याने हे जहाज थेट सागरात बुडवून टाकल्याचेही ट्रम्प सांगत आहेत. आता एकीकडे ट्रम्प यांनी हा दावा केलेला असताना दुसरीकडे त्यांनी कोलंबिया देशावर गंभीर स्वरुपाचे आरोप करत मोठा आणि धक्कादायक असा निर्णय घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केले गंभीर आरोपडोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांच्यावर काही आरोप केले आहेत. पेट्रो यांच्याकडून ड्रग्स निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोप केला आहे. सोबतच हा आरोप करत त्यांनी आता कोलंबियाला अमेरिकेकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. ही घोषणा ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल ट्रुथ या सोशल मीडियावर केली आहे. “कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो हे अवैध अमली गोळ्यांचे नेते आहेत. ते संपूर्ण कोलंबियात मोठ्या शहरांपासून ते छोट्या खेड्यापर्यंत अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. अमली गोळ्यांच्या उत्पादनासाठी ते प्रोत्साहन देत आहेत. अमली गोळ्यांची निर्मिती हा कोलंबियातील सर्वात मोठा उद्योग झाला आहे,” असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेने केले कोलंबियाचे अनुदान बंदसोबतच “गुस्तावो पेट्रो कोलंबियातील अमली गोळ्यांची निर्मिती थांबवण्यासाठी काहीही करत नाहीयेत. हे सगळं थांबवण्यासाठी त्यांना अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतं. मात्र ते अमली गोळ्यांची निर्मिती रोखण्यासाठी काहीही करत नसल्यामुळे आजपासून त्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जाणार नाही. अमली पदार्थांचे उत्पादन करून ते अमेरिकेत विकणे हाच कोलंबियाचा उद्देश आहे,” असेही मत ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
अन्यथा अमेरिकेचा दरवाजा बंद करूपुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी गुस्तावो पेट्रो यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. गुस्तावो पेट्रो यांनी मृत्यूचा खेळ खेळणे बंद करावे अन्यथा आम्ही त्यांच्यासाठी अमेरिकेचा दरवाजा बंद करू, अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांनी कोलंबियाचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.