नारळाच्या झावळ्यांचा आकाशकंदील
दिवेआगरमधील तरुणाचा पर्यावरणस्नेही दिवाळीचा संदेश
पाली, ता. १८ (वार्ताहर) ः नारळी-पोफळीच्या बागा असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील यश पिळणकरने नारळाच्या झावळ्यांपासून आकर्षक, पर्यावरणस्नेही आकाशकंदील बनवला आहे.
दिवाळी पर्यावरणपूरक व पर्यावरणस्नेही साजरी करण्यात यावी, हा संदेश देण्यासाठी यश पिळणकरने स्वतःच्या हाताने नारळाच्या झावळ्यांपासून हा आकाशकंदील बनवला आहे. हा आकर्षक व पर्यावरणस्नेही आकाशकंदील पाहण्यासाठी यशच्या घराजवळ अनेक जण गर्दी करीत आहेत.