दिवाळी साहित्याचे वाटप
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) ः शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते शिवसेना शाखा क्र. ११७च्या महिला आघाडी विधानसभा संघटक श्वेता पावसकर यांच्या वतीने दीपावली साहित्य व दिव्यांचे वाटप ज्येष्ठ शिवसैनिक बाबा कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी रश्मी पहुडकर, रवींद्र महाडिक, दीपाली पाटील, मामी मंचेकर, योगेश पेडणेकर, रजनी पाटील, सुधाकर पेडणेकर, राजेश पावस्कर, लिना मांडलेकर, भारती शिंगटे, अनंत पाताडे, विलास मोरे, बाळा कर्पे, अंजली पराडकर, शुभांगी शिंदे, सुवर्णा पवार, जयश्री पाटील, गीता गावड, वनिता शिंदे, कल्पना यादव, हेमलता सोनावणे, मधुरा नेवरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.