देहू, ता. १८ : देहू येथील देऊळवाडा येथे संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे दिवाळीनिमित्त ‘दिवाळी पहाट संगीत महोत्सवाला’ शुक्रवारी (ता. १७) सुरुवात झाली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सुनील महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे आदी उपस्थित होते. संगीत विशारद उद्धव बापू शिंदे यांनी तुकोबांची अभंगवाणी सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी विविध अभंग सादर केले.
---