धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दर घसरले
सोन्याच्या दरात ३००० रुपयांची घसरण
दिवाळीत ग्राहकांना मोठा दिलासा
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. सोन्याचे दर तीन हजार रुपयांनी घसरले आहेत. तर चांदीचे दर देखील किलोमागे 5000 रुपयांनी कमी झाले आहेत. धनत्रयोदशी निमित्त जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सोने चांदीचे दर काहीसे कमी झाले असले तरी येत्या काळात मात्र सोने आणि चांदीचे दर वाढत राहतील अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.
Gold Price Today: दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याने भाव खाल्ला, १० तोळ्याच्या दरात ३३३०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दरजळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर विना जीएसटी एक लाख 28 हजार 300 रुपयांवर आले आहे तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 70 हजार रुपयांवर आले आहेत. यामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे दर १ लाख ३० हजारांवर जातील. हे दर आज जरी कमी झाले असले तरीही ते वाढण्याची शक्यता आहे.
Gold Rate Today: दिवाळीच्या आठवडाभरापूर्वीच सोन्याने उच्चांक गाठला; १० तोळ्यामागे ३२०० रुपयांनी वाढ; वाचा सविस्तरधनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्या-चांदीची खरेदी करत असतात. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी चांगला मूहूर्त आहे. या मूहूर्तावर अनेकजण खरेदी करतात. सोन्याचे दर जवळपास १ लाख ३० हजार रुपये झाला आहे. तरीही ग्राहकांनी आज सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा या दिवशी सोने खरेदी करणे शुभ असल्याचे मानले जाते. त्यामुळेच ग्राहक आज मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. दरम्यान, पुढील चार दिवसदेखील सोने खरेदीमध्ये वाढ होत राहिल, असं सांगण्यात येत आहे.
Gold Rate : सोन्याच्या दरात होणार विक्रमी घट! कधी विकत घ्यायचं सोनं; वाचा तज्ज्ञ काय म्हणतायत?