दत्तकृपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बबनराव मोरडे
esakal October 19, 2025 01:45 PM

मंचर, ता. १८ : येथील श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पतसंस्थेचे संस्थापक बबनराव मोरडे व उपाध्यक्षपदी संजय मोरे यांची बिनविरोध निवड झाली. मंचर (ता.आंबेगाव) येथे सहाय्यक निबंधक सहकार यांच्या कार्यालयात पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली.
अध्यक्षपदासाठी मोरडे व उपाध्यक्षपदासाठी मोरे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी शांताराम शेटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सचिव विजय गवळी यांनी जाहीर केले. इतर निवड झालेल्या संचालकांची नावे - लक्ष्मण बाणखेले, शिवाजी निघोट, मगन कराळे, बाळासाहेब बाणखेले, बारकू जगताप, संतोष तागड, सविता मोरडे, ऊर्मिला जुन्नरे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.