श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्टतर्फे गरजूंना अन्नधान्य, मिठाई वाटप
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : कल्याणच्या श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्टतर्फे दर महिन्याला गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते. कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्षे हा उपक्रम चालू असून, अनेक गरजू या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं. आधारवाडीच्या लोटस रुग्णालयासमोर अन्नक्षेत्र असून, येथे हे उपक्रम राबविले जातात. गुरुवारी (ता. १६) झालेल्या या उपक्रमात संस्थेचे संचालक जसूबाई चंदाराणा, विनू तन्ना, छबील कारिया, मितुल देसाई, विष्णूकुमार चौधरी, भिखू कारीया, राजीव चंदाराणा, तुषार दाणी, रवि चौधरी, दयाल सजनानी, नटू खिमानी, वंश चंदाराणा, जतिन ठक्कर, मोनिश चंदाराणा, हरेश रूपारेलीया आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्यासह दिवाळीनिमित्त मिठाई फराळाचे वितरण करण्यात आले.