नालंदा बुद्ध विहारात वर्षावास धम्म प्रवचन मालिका उत्साहात
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : भारतीय बौद्ध महासभा शाखा नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी आषाढ ते अश्विन पौर्णिमेनिमित्ताने तीन महिन्यापासून सुरू असलेल्या धम्म प्रवचन मालिकेची सांगता उत्साहात झाली. हा कार्यक्रम शाखेचे अध्यक्ष राजू काऊतकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १४) पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय शिक्षिक प्रा. डॉ. आर. आर. कसबे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाखेचे अध्यक्ष राजू काऊतकर, साहेबराव मगरे, प्रतिभा शिरसाट, स्वाती आघाम, शरद गोंडगे हे उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या धम्म प्रवचन मालिकेत सहभाग आणि सहकार्य करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या वर्षावासाच्या महामंगल पर्वात प्रत्येक रविवार आणि पौर्णिमेस बौद्ध धम्माचे विचारवंत आणि कृतिशील चिकित्सक अशा विविध प्रवचनकारांची विविध प्रवचने आयोजित करण्यात आली होती.