रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने ७ विकेट्स घेतल्या आणि बंगालला विजय मिळवून दिला.
शमी सध्या भारतीय संघातून बाहेर असून आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळालेली नाही.
यावर शमीने केलेल्या विधानांवर अजित आगरकरने दिलेल्या प्रतिक्रियेवर आता पुन्हा शमीने प्रत्युत्तर दिले आहे.
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने शनिवारी (१८ ऑक्टोबर) संपले. पहिल्या फेरीत बंगालने उत्तराखंडविरुद्ध इडन गार्डन्स, कोलकाता येथे झालेल्या सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात बंगालसाठी अनेकांनी महत्त्वाचे योगदान दिले. यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही मोलाचा वाटा राहिला.
शमीने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ४ अशा मिळून ७ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. यावरून त्याने आता निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरला पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.
Shami vs Agarkar : मी त्याचं उत्तर देईन...! अजित आगरकरने मोहम्मद शमीच्या टीकेला दिले उत्तर; म्हणाला, बघतो आता कसा...२०२३ वनडे वर्ल्ड कपनंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. पण या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमनही केले होते. तो चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतही खेळला. पण त्यानंतरही त्याला दुखापतीचया कारणाने भारताच्या कोणत्याच संघात स्थान मिळाले नाही. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या वनडे आणि टी२० मालिकेसाठीही शमीला निवडले नाही.
त्याबाबत बोलताना शमीने म्हटले होते की त्याच्याशी बीसीसीआयच्या निवड समितीकडून संवाद साधण्यात आलेला नाही. तसेच तंदुरुस्ती नसती, तर बंगालकडून खेळलो नसतो. जर रणजी सामना खेळू शकत असेल, तर वनडे सामनाही खेळू शकतो, असं स्पष्टपणे शमीने म्हटले होते.
ज्यावर प्रतिक्रिया देताना NDTV च्या एका कार्यक्रमात निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी म्हटले होते की जर शमीला माझ्याबद्दल बोलायचे असेल, तर त्याला उत्तर देईल, तो जे म्हणाला ते मला कळालं, तर मी त्याला फोन करेल. मागील काही महिन्यांमध्ये बऱ्याचदा शमीसोबत चर्चा झाली आहे. याशिवाय त्यांनी म्हटले की आत्ताशी त्याचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे. त्याने दोन महिन्यात तंदुरुस्ती सिद्ध केली, तर परिस्थिती बदलेल.
यानंतर आता पहिला रणजी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर शमी पत्रकारांशी बोलताना आगरकर यांच्या विधानांवर प्रत्युत्तर देताना म्हणाला, 'त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणून दे. तुम्ही पाहिले आहे की मी कशी गोलंदाजी केली. जे आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर आहे.'
Ranji Trophy: पृथ्वी शॉ महाराष्ट्रासाठी पहिल्याच सामन्यात चमकला, ऋतुराज गायकवाडचंही सलग दुसरं अर्धशतकदरम्यान आता, शमी आणि भारतीय निवड समिती यांच्यातील वाद वाढत असल्याचे दिसत आहे. आता पुढच्या महिन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे त्यासाठी शमीची निवड होणार का हे पाहावे लागणार आहे.