निवृत्त जनरलची कोट्यवधीची फसवणूक
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) ः वैद्यकीय सुविधा प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक देण्याच्या बहाण्याने मुंबईतील एका एजंटने दिल्लीतील निवृत्त लेफ्टनंट जनरलला सव्वा दोन कोटींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
दिल्लीतील निवृत्त लेफ्टनंट जनरल आरोग्यसेवा प्रकल्पावर काम करणाऱ्या एसजीएल अल्फा-७ कंपनीचे संचालक आहेत. कोल्हापूर येथे वैद्यकीय सुविधा उभारण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी ३०० मिलियन युरोची आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीची आवश्यकता होती. यासाठी
अर्पित खट्टोड नामक व्यक्तीशी त्यांनी संपर्क साधला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्पित खट्टोड याच्यासोबत करार करून दोन कोटी २५ लाख ६० हजारांची रक्कम घेतली होती. पैसे मिळाल्यानंतर अर्पित खट्टोडने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच बनावट पत्र पाठवून फसवणूक केली.