ओझर: वणी दिंडोरी कडून पुण्याला जाणारी वाहने मधला मार्ग म्हणून दिंडोरी, मोहाडी, सिद्धपिंप्री, औरंगाबाद महामार्गाने पळसे या शॉटकर्टला पसंती देतात. कार्गोला जाणाऱ्या ट्रेलरचा हा मार्ग असल्याने दहाव्या मैलावर कायमच वाहनांची कोंडी होते. आज सणासुदीत तब्बल तीन तास वाहनचालक कोंडीत फसले. त्यामुळे दहाव्या मैलावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जानोरीकडून दिंडोरीकडे ये-जा करणाऱ्या मोठ्या कंटेनरमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल चौफुलीवर कोंडी आता नित्याचीच झाली आहे. कोंडीत अडकलेल्या वाहन धारकांना कुणी वाहातूक पोलिस नसल्याने गाडीतून उतरुन स्वताच कोंडीतून मार्ग काढावा लागतो.
आज शनिवार (ता.१८) दुपारी तीन साडे तीन तास वाहतुक कोंडी झाली. त्यामुळे कोंडीत फसलेल्या अनेकांनी जऊळके गावाकडून तर काहींनी मधला मार्ग जाण्यासाठी निवडला, मात्र रस्ता माहित नसल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी फजीती झाली. त्यातून वाहतुक कोंडीचा प्रश्न आधीकच तीव्र झाला.
जानोरी दिंडोरी येथील मोठ-मोठ्या कंटेनरची वाहतूक दहावा मैल चौफुली येथे वाढली आहे. आज काही वाहनचालकांनी कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने चालकांनी स्वताच रस्त्यावर उतरुन वाहातूक सुरळित करण्याचा प्रयत्न केला.
Mokhada ST Bus : ऐण सणात भंगारात निघालेल्या बस प्रवाशांच्या सेवेला, जव्हार आगाराचा गलथान कारभार, प्रवासी त्रस्तपोलिस गायब
जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय महामार्गावरील साकोरा फाटा येथे कार्यरत आहे. तेथील पोलिस स्पीड व्हॅन याच महामार्गावर दंड वसुलीसाठी उभी असते. दहावा मैल चौफुलीवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली असताना जिल्हा वाहतूक शाखेला याची कल्पना नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे.