"ती फक्त अंडी खाऊन जगत होती" परवीनच्या अखेरच्या दिवसाबाबत पूजा बेदीचा खुलासा; FBI ची भीती आणि एकटेपणा
esakal October 20, 2025 02:45 AM

Bollywood News : बॉलिवूडमधील उत्तम आणि बोल्ड अभिनेत्री परवीन बाबी आजही तिच्या अनेक सिनेमांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अखेरच्या काळात ती स्क्रीनझोफेनिया सारख्या आजाराचा सामना करत होती. तिचा मृत्यू झाला तेव्हा तिच्याजवळ कुणीच नव्हतं. तिचा मृत्यू झालाय हे समजायला आठ दिवस उलटून गेले. नुकतंच पूजा बेदीने तिच्याविषयी काही खुलासे केले.

पूजा बेदी ही अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी आहे. कबीर बेदी आणि परवीन बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पूजाने काही खास आठवणी सांगितल्या. काय म्हणाली पूजा जाणून घेऊया.

"मला आठवतंय ती बऱ्याच काळाने भारतात परत आली होती. सगळे म्हणत होते काहीतरी गडबड आहे. मी जेव्हा तिच्या घरी गेले आणि दरवाजा खोलला तेव्हा ती खूप वेगळी दिसत होती. तिचं वजन वाढलं होतं, केस विस्कटलेले होते. मला पाहून खुश झाली. मला नमस्कार केला आणि बसायला सांगितलं. नंतर मला मिठी मारली आणि आम्ही गप्पा मारल्या. हे सगळं माझ्यासाठी नॉर्मल होतं."

"त्यानंतर ती मला म्हणाली की मला माफ कर. मी तुला खायला देऊ शकत नाही करणं मी फक्त अंडी खाते:" त्यावर मी तिला यामागचं कारण विचारलं तर ती म्हणाली की ही एकच गोष्ट आहे ज्यात कुणी गडबड करू शकत नाही. त्यावर मी विचारलं कोण त्यावर ती म्हणाली की सिक्रेट सर्व्हिस, एफबीआय. "

पूजाने हे ही सांगितलं की, परवीन बाजारातून मेकअप प्रोडक्टस खरेदी करणं बंद केलं होत. बाजारातील मेकअप सिक्रेट सर्व्हिसचे लोक खराब करतात. त्या कधी खरेदीला जाणार आहेत हे त्यांना माहित असतं असं उत्तर त्यांनी पूजाला दिलं होतं. त्यानंतर पूजाला जाणीव झाली की त्यांच्या मानसिक स्वास्थ्यात गडबड आहे आणि तिला काळजी वाटू लागली.

कबीर बेदी यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं की, जेव्हा त्यांनी परवीनला मानसिक उपचार घेण्याविषयी सुचवलं तेव्हा स्वतःहून तिने नातं तोडलं होतं. त्यांनतर दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडत गेली.

"हा सिनेमा सिक्वेल नाही" पुन्हा शिवाजीराजे सिनेमाच्या वादावर महेश मांजरेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले..
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.