अटी मान्य करा, नाही तर अख्खा देश उडवेल… डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जग हादरलं, तब्बल दोन तास…
GH News October 20, 2025 10:10 AM

युक्रेन रशिया युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करताना दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबवायचे असल्याचे त्यांनी म्हटले. यादरम्यानच नुकताच डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांच्यात भेट झाली. ही भेट व्हाईट हाऊसमध्ये झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी जेलेन्स्की यांना स्पष्ट सांगितले की, रशियाचे म्हणणे मान्य करत नाही तर पुतिन अख्ख्या युक्रेनला संपवेल. मिळालेल्या रिपोर्टनुसार, काही मुद्द्यांवरून बैठकीमध्ये वातावरण तापले होते. जेलेन्स्की आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चांगलाच चढला. जेलेन्स्की काही मुद्द्यांवर अडल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी काही अपशब्दांचा वापर केल्याचेही कळतंय.

बैठकीदरम्यान, ट्रम्प यांनी युक्रेनियन युद्धक्षेत्राचे नकाशे बाजूला फेकले आणि जेलेन्स्की यांना सांगितले की, त्यांनी संपूर्ण डोनबास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवावे. याशिवाय युक्रेनकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. हे युद्ध हरत आहेत आणि जर पुतिन यांना हवे असेल तर ते त्यांना पूर्णपणे नष्ट करतील. यामुळेच ही योग्य वेळ असून युक्रेनने रशियाच्या अटी मान्य कराव्यात. गेल्या काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केली आहेत.

वोलोदिमिर जेलेन्स्की यांना अमेरिकेकडून अत्यंत घातक असलेले क्षेपणाशास्त्र हवे आहे. पण ट्रम्प यांनी स्पष्ट केले की,  त्यांचे टार्गेट आता फक्त युक्रेनची लष्करी ताकद वाढवण्यावर नाही तर शांतता करार करण्यावर आहे. थोडक्यात काय तर युक्रेन अमेरिकेला मागत असलेले घातक क्षेपणास्त्र त्यांना मिळण्याचे संकेत आता फार जास्त कमी आहेत. शांतता करार लवकर व्हावा, यावर आपला भर असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

वोलोदिमिर जेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक तब्बल 2 तास सुरू होती. जेलेन्स्की सतत लांब पल्ल्याच्या टोमाहॉक क्षेपणास्त्रांची मागणी करत होते. मात्र, ट्रम्प यांनी त्यांची ती मागणी मान्य केली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेलेन्स्की यांना रशियासोबत सुरू असलेले हे युद्ध रोखण्याचा सल्ला दिला. फक्त हेच नाही तर रशियाच्या अटी मान्य करतात आणि लवकरात लवकर शांतता करार करून घ्या असेही जेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.