दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 11 हजारांची वाढ, काय आहेत कारणे? आज भाव क
Marathi October 20, 2025 02:26 PM

सोन्याच्या दरात वाढ: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याची चमक अधिकाधिक वाढताना दिसत आहे. विशेषतः मागील पंधरवड्यात सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार 100 रुपयांची वाढ झाली असून, चांदी प्रति किलो 11 हजारांनी महागली आहे. या वाढीमागे अनेक कारणं दडलेली आहेत. ब्रिक्स देशांचं नवीन चलन, डॉलरवरील निर्माण झालेला दबाव, युद्धाची पार्श्वभूमी आणि डॉलरचं संभाव्य अवमूल्यन यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सोने साठवण्यावर भर देत आहेत. (Gold Silver Rates)

सोन्याच्या चढ्या दरामुळे सध्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पाळले आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 gm 1 लाख 27हजार 970 रुपये झालं असून  चांदी किलोमागे 1 लाख 56 हजार 400 रुपयांवर पोहोचलीय. (Gold Prices Today)वर्षभरापूर्वी, 20 ऑक्टोबरला सोन्याचे दर 77,770.00 रुपये होते. महिन्याभरापूर्वी  20 सप्टेंबर रोजी 110,220.00 तर आठवडाभरापूर्वी म्हणजेच 13 ऑक्टोबरला सोन्याचे दर 124,520.00 रुपये होते.

Gold Price:दिवाळीच्या पाडव्याला सोने खरेदीसाठी लगबग

गेल्या 15 दिवसात सोन्याचे दर तब्बल 11 हजारांनी वाढलेत. लग्नसराईमुळे बाजारात खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. भाव वाढले तरी ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत असून, साडेतीन मुहूर्तावर सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळेच दिवाळी पाडव्यालाही सराफ बाजारात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने हे नेहमीच सुरक्षित मानले जाते, तसेच दागिन्यांची वाढती मागणीही सोन्याचे दर उंचावण्यास कारणीभूत ठरत आहे.

दसऱ्यापासून सोन्याचा चढता आलेख

दसऱ्याच्या सुमारास सोन्याचे दर आधीच उंचावले होते. दिवाळीत आणखी वाढ होईल, असा अंदाज असल्याने अनेकांनी आगाऊ बुकिंग केलं आहे. डॉलर कमजोर झाल्यास नुकसान टाळण्यासाठी अनेक बँका डॉलर विकून सोने खरेदी करत आहेत. तसेच युद्धस्थिती आणि रुपयाच्या घसरणीमुळेही सोने महाग झालं आहे.

दरवाढीमुळे सीमाशुल्कातही वाढ झाली असून, आता ते एकूण 11 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. हीच वाढ मागील 15 दिवसांतील दरवाढीत दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे.दसऱ्यापासून आतापर्यंत सोनं 10 हजारांहून अधिक रुपयांनी महाग झालं आहे आणि पुढील काळातही दर आणखी वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. लग्नसराई, सण-उत्सव आणि गुंतवणुकीच्या पारंपरिक विश्वासामुळे ग्राहक पुन्हा सोन्याकडे पुन्हा वळत आहेत.

सोन्याच्या तेजीची प्रमुख कारणं

-ट्रम्प यांच्या अध्यक्षतेनंतर वाढलेले जागतिक तणाव

-रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन

-अमेरिका आणि युरोपमधील आर्थिक मंदी

-मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली सोने खरेदी

गेल्या वर्षभरात चांदीचे भाव कधी आणि किती होते?

-07 ऑक्टोबर – 2024 – 88 हजार रुपये प्रति किलो.

-1 जानेवारी – 2025 – 99 हजार 500 रुपये प्रति किलो.

-1 मार्च 2025 – 1 लाख 01 हजार रुपये प्रति किलो.

-1 जून 2025 – 1 लाख 10 हजार रुपये प्रति किलो.

-1 सप्टेंबर 2025 – 1 लाख 40 हजार रुपये प्रति किलो.

18 ऑक्टोबर 2025 – 1 लाख 68 हजार रुपये प्रति किलो

20 ऑक्टोबर 2025- 1 लाख 56 हजार 400 रुपये प्रति किलो

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.