swt1931.jpg
99696
आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळः येथील ग्रामपंचायतीत आयुष्मान आणि वयोवंदना कार्डसाठी विशेष शिबिर आयोजित केले होते.
आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ येथे
आयुष्मान, वयोवंदना कार्ड शिबीर
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : मुख्यमंत्री पंचायत राज योजनेच्या अनुषंगाने आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायत येथे आयुष्मान भारत योजना कार्ड आणि ७० वर्षे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांसाठी वयोवंदना कार्ड काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.
अनेक पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक आरोग्य सुविधांसाठी महत्त्वपूर्ण असलेले आयुष्यमान भारत कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वयोवंदना कार्डासाठी नोंदणी केली. यावेळी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहकार्य केले. यावेळी सरपंच रश्मी टेंबुलकर, ग्रामपंचायत अधिकारी: प्रकाश सरमळकर, ग्रामपंचायत सदस्य श्रुती सुकाळी, कर्मचारी विजय चव्हाण, अवंतिका सांडव, केंद्र चालक प्रिशा बांदल, आरोग्य सेविका श्रीमती एस. जी. डवरी, सीएचडी श्रीमती नार्वेकर, आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड, आशा स्वयंसेविका श्रीमती गौरी सुकाळी, ग्रामस्थ प्रतिनिधी रवींद्र टेंबुलकर आदी उपस्थित होते. सरपंच रश्मी टेंबुलकर यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही ग्रामस्थांच्या हितासाठी अशा योजना प्रभावीपणे राबवल्या जातील, असे आश्वासन दिले. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली.