पुणे, ता. २० : शहरातील यशस्वी उद्योजक साहेबराव लोणकर यांना सामाजिक, राजकीय, व्यापारी, वैद्यकीय आणि तांत्रिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल सामाजिक संस्था पुणे’तर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या वेळी अभिनेत्री संगीता बिजलानी, रांका ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक फत्तेचंद रांका, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, लायन्स गव्हर्नर राजेश अग्रवाल, भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे तांत्रिक सल्लागार डॉ. मनीष भारद्वाज यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणकर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दिलीप लोणकर, अमित अग्रवाल, नारायण जाधव, एस. एस. बिरादर, अविनाश सकुर्डे, गिरीश सांभाळ, डॉ. अभिजित सोनकणे आदी उपस्थित होते.