दहिवडी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत माण तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने निवडणूक लढवणार, असा विश्वास जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी व्यक्त केला.
Solapur Fraud:'शेअरमध्ये गुंतवून सीए सव्वादोन कोटींना फसले'; सोलापूर सायबर पोलिसांना मिळाली तीन खात्यांची माहितीदहिवडी येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारत अनुसे, रफिक मुलाणी, दादा दडस, समीर ओंबासे, दाजीराम पवार, धनंजय पवार, महादेव इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘कुकुडवाड गटाचे आरक्षण खुले व्हावे अन् तिथून मी निवडणूक लढवावी, यासाठी गेली वीस वर्षे मी वाट बघत होतो. त्यामुळे यंदा या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून देसाई आडनावाचा उमेदवार उभा राहणारच, मग तो अनिल देसाई वा महेंद्र देसाई वा आणखी कोणी देसाई असेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत युती, आघाडीचा अजून कोणताही विषय नाही. अजित पवार यांची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असणार आहे.’’ सातत्याने गेली ३० वर्षे समाजकारण, राजकारणात काम करणारा मी कार्यकर्ता आहे.
Electric shocks:'फ्लेक्स लावताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू'; सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद येथील घटना..नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमचे नेते अजित पवार जो संदेश देतील अन् जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अजित पवार यांनी नैसर्गिक आपत्तीत अडीअडचणींचा सामना करताना सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी तिजोरीतील दारे खुली केली होती. त्यामुळे अशा कर्तबगार नेत्याचे हात बळकट करण्यासाठी आम्ही ताकदीने निवडणूका लढू, असे श्री. देसाई यांनी सांगितले.