आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनीचं (मूत्रपिंडांचं) आरोग्य चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण किडनी शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढते आणि रक्त शुद्ध ठेवण्याचं मोठं काम करते. पण आपल्या दैनंदिन सवयीच कधी कधी या महत्त्वाच्या अवयवाला नुकसान पोहोचवतात, हे अनेकांना कळतही नाही. विशेषत: सकाळच्या वेळचे काही सवयी अशा आहेत ज्या दीर्घकाळात किडनीवर विपरीत परिणाम करू शकतात. (morning habits that damage kidney health)
इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आपल्या आयुष्यातील काही लहान वाटणाऱ्या गोष्टींचा थेट परिणाम मूत्रपिंडांवर होतो. त्यामुळे खालील ५ सवयी टाळल्यास किडनीचं आरोग्य टिकवून ठेवता येईल.
1) सकाळी उठल्यावर पाणी न पिणे
रात्रभर झोपेत असताना शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर किडनीला पाण्याची गरज भासते. पण बरेच लोक चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करतात, ज्यामुळे शरीर आणखी डिहायड्रेट होतं. दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याने करणे ही किडनीसाठी चांगली सवय आहे.
2) लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे
सकाळी उठल्यानंतर अनेकजण लघवी रोखून ठेवतात, पण ही सवय अत्यंत घातक आहे. लघवी रोखल्याने मूत्राशयावर आणि किडनीवर दाब येतो, ज्यामुळे संक्रमण (इन्फेक्शन) होऊ शकतं. त्यामुळे उठल्याबरोबर शरीर रिकामं करणं आवश्यक आहे.
3) रिकाम्या पोटी वेदनाशामक औषध घेणे
आजकाल डोकेदुखी, अंगदुखी किंवा मासिक पाळीच्या वेदनांवर अनेकजण लगेच पेनकिलर घेतात. पण जर ही औषधं रिकाम्या पोटी घेतली, तर ती थेट किडनीला हानी पोहोचवू शकतात. नेहमी अशा औषधांसोबत पाणी किंवा थोडं अन्न घ्यावं.
4) व्यायामानंतर पाणी न पिणे
व्यायामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. जर त्यानंतर पाणी प्यायलं नाही, तर शरीरात टॉक्सिन्स साचतात आणि किडनीवर ताण येतो. त्यामुळे प्रत्येक व्यायामानंतर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे.
5) नाश्ता टाळणे
सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो. पण नाश्ता न केल्याने शरीरात मीठाचं प्रमाण वाढतं आणि जास्त सोडियम किडनीवर दबाव आणतो. त्यामुळे सकाळी प्रथिनयुक्त आणि पौष्टिक नाश्ता करणं आरोग्यासाठी आवश्यक आहे.
किडनीचं संरक्षण कसं कराल?
1) दररोज पुरेसं पाणी प्या.
2) खारट पदार्थ आणि तळलेलं अन्न कमी खा.
3) झोप पूर्ण घ्या आणि ताण टाळा.
4) अल्कोहोल आणि स्मोकिंगपासून दूर राहा.
किडनीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर या छोट्या सवयींमध्ये वेळेत बदल करा. कारण किडनी एकदा निकामी झाली की, ती पुन्हा पूर्ववत होणं कठीण असतं.