मुंबई : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले असताना मंगळवार (ता. २१) पर्यंत केवळ ५ हजार ८६६ कोटी ९६ लाख ४ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. दिवाळसणातील लक्ष्मीपूजनाचा दिवस उलटला तरी केवळ ६३ लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळालेली आहे. राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीतही राज्य सरकारच्या या मदतीची प्रतीक्षा आहे.
राज्य सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ६८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यापैकी ४८ लाख ४१ हजार १५१ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत देण्यात आली आहे. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती. कोणत्याही अटी शर्थींशिवाय मदतीची केलेली घोषणा हवेत विरली असून तुकड्या तुकड्यांनी मिळणारी मदत आता शेतकऱ्यांना दिवाळीनंतरच मिळणार आहे. सलग सुट्या आणि रखडलेले पंचनामे यांमुळे मदतीला वेळ लागत आहे.
अतिवृष्टी बाधितांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे जाहीर केले होते. पण राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषात दोन हेक्टरची मर्यादा असल्यामुळे आजवर अतिवृष्टी बाधितांना मिळालेली मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत होती. वास्तविक राज्य सरकारकडे निधीचा तुटवडा असल्याने केंद्र सरकारने प्रतिपूर्तीच्या रूपात निधी दिल्यानंतर आता उर्वरित एक हेक्टरची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित एका हेक्टरला मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपत्ती आणि पुनर्वसन विभागाने सोमवारी उशिरा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, नवे लेखाशीर्ष उघडण्यात आले आहे.
Koregaon Crime: 'जयपूरमध्ये जमिनीच्या वादातून कोयत्याने वार'; रहिमतपूर पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध ११ जणांवर गुन्हायापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र तीन हेक्टरपर्यंत असेल, अशा शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून ६४८ कोटी, १५ लाख ४१ हजार रुपयांच्या वितरणास मान्यता दिली आहे. अतिवृष्टी व महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून एकूण ८ हजार १३९ कोटी रुपये वितरित केल्याचा दावा मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे.
सहा लाख शेतकऱ्यांना मदत
तील ६ लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांचे तीन हेक्टरवर क्षेत्र बाधित होऊनही त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळाली होती. या शेतकऱ्यांचे ६ लाख, ५६ हजार ३१० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे.
पॅकेज जाहीर झाल्यानंतर शासन आदेशांनुसार
मिळालेली मदत (रुपयांत)
तारीख शेतकरी संख्या मदत
१८ ऑक्टोबर ३३ लाख ६५ हजार ५४४ ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार
१७ ऑक्टोबर ८८ हजार ६४९ १२३ कोटी ४४ लाख ५७ हजार
१५ ऑक्टोबर ६ लाख ७२ हजार ८६६ ४८० कोटी ३७ लाख
१६ ऑक्टोबर २१ लाख ६६ हजार १९८ १३५६ कोटी ३० लाख २२ हजार
२० ऑक्टोबर ६ लाख १२ हजार १७७ वाढीव १ हेक्टरसाठी ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार
एकूण शेतकरी : ६२ लाख ९२ हजार २५७
एकूण मदत : ५८६६ कोटी ९७ लाख ४ हजार
यंदाच्या खरिपात मदत : ८१३९ कोटी