यंदा २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी बहिणीसाठी देऊ शकता हटके आणि हृदयाला भिडणाऱ्या भेटवस्तू. फक्त वस्तू नव्हे, तर भावना गिफ्ट करा.
तिच्या नावाच्या पहिल्या अक्षराचं लॉकेट, ब्रासलेट किंवा खास मेसेज असलेली अंगठी बहिणीसाठी परफेक्ट गिफ्ट ठरेल
तिच्या आवडीची स्किनकेअर प्रॉडक्ट्स, फेस मास्क, बॉडी मिस्ट वगैरे गोष्टींनी भरलेला छोटा हॅम्पर तिला रिलॅक्स वाटायला लावेल
तुमच्या दोघांच्या जुन्या आठवणींनी भरलेलं स्क्रॅपबुक किंवा पर्सनलाइज्ड फोटो फ्रेम गिफ्ट द्या.
मुलींना आवडणाऱ्या छोट्या गोष्टींचा एकत्रित बॉक्स तयार करा. त्यात स्क्रंची, लिप बाम, चॉकलेट्स, परफ्यूम्स आणि खास नोट द्या.
एखादं चांगलं मोटिव्हेशनल किंवा तिच्या आवडीचं पुस्तक भेट द्या. त्यात तुमचं एक खास पत्र ठेवा. तिला नक्कीच आवडेल
बहिणीसोबत एक 'डे आउट' प्लॅन करा जेवण, कॉफी, शॉपिंग किंवा फोटोज काढून एकत्र वेळ घालवा.