Indian Railway : तुमचा गुटखा आणि चिप्समुळे ट्रेन होऊ शकते लेट, कनेक्शन काय ?
Tv9 Marathi October 23, 2025 05:45 AM

रेल्वेचा प्रवास मजेशीर आनंददायी असतो. प्रवासात असताना खाता-खात बाहरेची दृश्य पाहत वेळ कसा निघून जातो आणि यात्रा कधी पूर्ण होते ते समजतही नाही. पण कधी अशी वेळ येते की ट्रेन रस्त्यात मध्येच थांबते आणि बराच काळ अडकते, मग तेव्हा खूपच कंटाळा येतो. पण एक गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की, ट्रेनला ब्रेक लागण्याचं कारण तु्म्ही देखील असू शकता. हो, हे खरं हे. ट्रेन किंवा स्टेशनमध्ये तुमचा गुटखा, चिप्स यामुळे ट्रेन थांबू शकते, लेट होऊ शकतो. भारतीय रेल्वेद्वारे करण्यात आलेल्या एका तपासणीदरम्यान हा खुलासा झाला आहे.

देशभरात रेल्वेचं जाळं 70 हजार किमीपेक्षा जास्त पसरलं आहे, ज्यामध्ये अंदाजे 23 हजार गाड्या (प्रवासी आणि माल) वाहून नेतात. फक्त प्रवासी गाड्यांची संख्या 13, 000 पेक्षाही जास्त आहे. यापैकी सुमारे 4 हजार प्रीमियम गाड्या (वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी सारख्या) आणि मेल एक्सप्रेस गाड्या आहेत. पण प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनामुळे या गाड्या अनेकदा उशिराने धावतात.

रेल्वे मंत्रालयाच्या तपासात काय आढळलं ?

भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अलिकडेच, रेल्वे रुळांची पाहणी केली.या रुळांवर आढळणारा सर्वात सामान्य कचरा म्हणजे गुटख्याचे पाउच होते. जितक्या दूरर्यंत ही तपासणी करण्यात आली, तिथे ठिकठिकाणी गुटख्याचे हे पाऊच आढले आणि काही ठिकाणी टिप्सची पाकिटंही होती. त्याशिवाय आणखी काही गोष्टी सापडल्या.

या कारणामुळे थांबतात ट्रेन

मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, प्रवास करताना अनेक प्रवासी गुटख्याचं पाकिट उघडतात आणि प्रथम त्याचा वरचा भाग खिडकीतून बाहेर फेकतात, नंतर गुटखा खाल्ल्यानंतर दुसरा भागही तेथून टाकतात. त्यामुळे गुटख्याचे हे पाऊच अनेकदा खाली ट्रॅकवर पडतात किंवा उडून मागच्या दिशेने जाता.ट्रेन पुढे जात असताना ते पाऊच हवेत उडतात, त्यापैकी काही पाऊच अनेकवेळेस सिग्नलमध्ये अडकतात आणि त्यामुळे सिग्नलचं काम बंद पडतं, असं समोर आलं. आणि सिग्नल बंद पडल्यावर ट्रेन्स तिथेच थांबतात, कारण रेल मॅन्युअलनुसार, ट्रेन तिथेच थांबवणं गरजेचं असतं. त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्याही थांबतात.

वेळ कसा वाढतो ?

जर सिग्नल खराब असल्याचं दिसून आलं तर लोको पायलट त्यासंबंधी जवळच्या स्टेशन मास्टरला कळवतो. जर तो पास झाला तर स्टेशन मास्टर स्वतः तिथे जातो किंवा जवळच्या गेटमनला सिग्नलमधून पाऊच तपासण्यासाठी आणि तो सिग्नलमधून बाहेर काढण्यासाठी पाठवतो. त्यानंतरच सिग्नलचं काम सुरू होतं आणि मगच ट्रेनचा प्रवास पुढे सुरू होतो. त्याप्रमाणेच चिप्सची पाकिटही अनेकवेळा सिग्नलमध्ये अडकतात. म्हणजेच गुटखा आणि चिप्समुळेच ट्रेनला विलंब होतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.