अमरावतील ऐन दिवाळी पाडव्यालाच शिमगोत्सव सुरू आहे. एकमेकांविरोधात ठेवणीतील बॉम्ब, सुरसुऱ्या, भूईचक्र, रॉकेटचा मारा सुरू आहे. दोन दिवसांपासून अमरावतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्याने बच्चूभाऊ कडू यांच्यावर चिडी बॉम्ब सोडल्यानंतर या राजकीय वाक् युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज तर या राजकीय धुराळ्यात शिंदे गटाला पण फरफटत आणल्या गेल्याने एकच गदारोळ उडाला आहे.
रवी राणांचा बच्चू भाऊंवर ‘प्रहार’
बच्चू कडू यांची नौटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही. बच्चू कडू यांचे कर्तुत्व काय आहे? बच्चू कडू नी 100 लोकांना देखील रोजगार दिला का? शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे. शेतकऱ्याच्या मुलाने बच्चू कडूंचा निवडणुकीत 12 हजार मतांनी पराभव केला. शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नौटंकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला.
फक्त पैशासाठी गुवाहाटी दौरा
बच्चू कडू हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला. ना बाप ना बडा भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले. राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात. त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय. बच्चू कडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले. चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये, असे राणा म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला. पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला. कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात. बच्चू कडू ना इंजेक्शन देण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला. जेव्हा एखादं कुत्र कावरत असते त्याला उपचाराची गरज असते. बच्चू कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे. जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते आपोआप सरेंडर होऊन जाईल, असे राणा म्हणाले.
पैशांसाठी आंदोलन केले
बच्चू कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले. विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे. तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिवीगाळ कराल आमदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का. बच्चू कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये. चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागतात.
मी स्वाभिमान पक्षात आहे नवनीत राणा भाजपमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाच्या अनेक मोठमोठे नेत्यांनी स्वीकारलं म्हणून नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही आधी काँग्रेस सोबत होते नंतर उद्धव ठाकरे सोबत होते नंतर एकनाथ शिंदे सोबत होते एखादा ट्रम्पचा जर पक्ष आला तर त्यात तुम्ही जाल
रवी राणा एका पक्ष शिवाय दुसरे पक्षाकडे तिकीट मागायला गेला नाही महाराष्ट्रात अशी अनेक कुटुंब आहे की एका घरात चार चार पक्ष आहे. तुम्ही उठ सुट टीका करता तुमची कुवत काय आहे तुम्ही सोफीयाच आंदोलन केलं होतं तिथे पैसे घेतले. पैसे खाण्याचं रेकॉर्ड बच्चू कडू यांनी केलं आहे. पैसे खाण्यात त्यांचा अवल नंबर लागेल, असा आरोप रवी राणा यांनी कडूंवर केला.
संजय राऊतांवर टीका
कितीही चांगलं काम राज्य सरकारने केलं तरी ते टीका करणार मातोश्रीला खुश करण्यासाठी संजय राऊत हे चापलुसी करतात. संजय राऊत यांचा भोंगा सकाळी वाजतो. त्यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मदत केली. फक्त एका मतांनी संजय राऊत निवडून आले. राऊतांना मी मतदान केल आहे आणि ज्या आमदारांनी मतदान केलं त्यांना ब्लॅकमेलर म्हणन हे योग्य नाही, असे मतरवी राणा यांनी सुनावलं.