लग्नाचा सिझन लवकरच सुरु होणार आहे.लग्नाशी संबंधित अनेक रितीरिवाजाच्या चर्चा नेहमीच होत असतात. परंतू लग्नाची पहिली रात्र ज्याला मधूचंद्राची किंवा हनीमुन वा सुहागरात म्हणतात. या रात्री बेडरुम सजवण्यासाठी शक्यतो सुवासिक फुलांचा वापर होत असतो. पती आणि पत्नी पहिल्यांदा एकमेकांचे होतात. बिछान्यावर सुंगधीत फुलांची सजावट केली जाते. परंतू अलिकडे एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यातील फुलांसोबत अशा वस्तूंचा वापर केला आहे हे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही.यामुळे या व्हिडीओवर युजरनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. दोन जीव जेव्हा रेशमाच्या बंधनात अडकतात तेव्हा त्यांच्यासाठी ही मधूचंद्राची रात्र एकमेकांना समजून घेण्यासाठी महत्वाची असते. मधूचंद्राच्या रात्रीसाठी घरातील बेडरुमला खूप सजवलेले असते. नवपरिणित वधू-वराला कसली अडचण होऊ नये.त्यामुळे मंद सुंगधाच्या फुलांची उधळण केलेली असते. परंतू सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात बेडरुममधील वस्तू पाहून आपण हैराण होऊन जातो.
इंस्टाग्राम अकाऊंट @bangerkumarr वर अलिकडे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.या व्हिडीओत मधूचंद्राच्या रात्रीच्या एका खोलीचा भाग दाखवला आहे. या खोलीला खुप फुलांनी सजवलेले दिसत आहे. निरनिराळी फुले या रुममध्ये मांडलेली दिसत आहे. बिछाण्यावर देखील फुलांचा सडा पडलेला दिसत आहे. मात्र, यात एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे फुलांसोबत फळेही लटकवलेली आहे. या फळांमध्ये अननस देखील दिसत आहेत. या फळांचा पडदा जणू तयार करण्यात आलेला आहे.
येथे व्हिडीओ पाहा –
मधूचंद्राच्या रातीला फळांनी सजवला बेडरूम
View this post on Instagram
A post shared by bangerkumarr (@bangerkumarr)
या व्हिडीयातील बेडरुमला मधूचंद्रासाठी सजवलेले आहे. परंतू फुलांसोबत फळेही टांगलेली दिसत असल्याने हे मजेशीर वाटत आहे. गुलाबी आणि सफेद फुलांनी बिछान्यावर हृदयाचा आकार काढलेला आहे. मध्येच द्राक्षे, सफरचंद, अननस, डाळींबं,संत्री, टरबूज आदी फळे लटकलेली दिसत आहेत. व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळायला मार्ग नाहीए. परंतू हा व्हिडीओ पाहून हसू फूटत आहे.अनेक युजर्सनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केलेल्या आहेत.