भारतात मोठ्या जोशात फटाक्यांच्या आतीषबाजीत दिवाळी साजरी झाली.परंतू कोरोनानंतर फटाक्यांचे कमी झालेले प्रमाण या वर्षी पुन्हा वाढले आहे. दिल्ली सारख्या राजधानीत तर हवा इतकी अशुद्ध झाली आहे की तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याची नौबत आली आहे.तर अशात कठोर कायदे असलेल्या सिंगापूरात फटाके फोडल्याच्या आरोपाखाली एका भारतीयाला अटक झाली आहे.
भारतीय लोक ज्या देशात जातात तेथे आपल्या प्रथा परंपरा चालू ठेवण्याचा प्रयत्न करात. परंतू अशा प्रथापरंपरा पाळताना तेथील स्थानिक कायदे काय आहेत याची जाणीव असायला हवी. कारण सिंगापूरात दिवाळीचा जोश साजरा करताना आतिषबाजी केल्या आरोपावरुन बुधवारी ३९ वर्षीय भारतीय मूळ असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. येथे शहरात आतिषबाजी करण्यास विरोध आहे.
चॅनल न्यूज एशिया रिपोर्टनुसार दिलीप कुमार निर्मल कुमार याने गेल्या आठवड्यात येथील कार्लिस्ले रोडवर खुल्या मैदानात कथितपणे आतिषबाजी केली होती. त्याच्यावर बंदूक, विस्फोटक आणि शस्रास्र नियंत्रण अधिनियम २०२१ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा आतिषबाजी करणारा एक व्हिडीओ ऑनलाईन पोस्ट करण्यात आला. बातमीनुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. दिलीप व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर झाले. येथे अटक केलेल्या लोकांना ऑनलाईन कोर्टात सादर केले जाते. त्यांना आता २० नोव्हेंबर रोजी पुन्हा कोर्टात सुनावणीसाठी हजर व्हावे लागणार आहे. निषिद्ध विस्फोटकाच्या बेकायदा वापराच्या गुन्ह्यात पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १००,००० सिंगापूर डॉलर ( ७७,००० अमेरिकन डॉलर ) इतक्या प्रचंड दंडाची शिक्षा या कायद्यानुसार दोषी ठरल्यानंतर आहे.