Guru Transit 2025: देवगुरु बृहस्पति १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश केला आहे. कर्क ही गुरुची उच्च राशी असल्याने काही राशींवर अत्यंत शुभ परिमाण दिसून येतील. गुरु आता ३ डिसेंबरपर्यंत कर्क राशीत राहणार असून त्यानंतर वक्री अस्वस्थेत मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत.
ज्योतिषानुसार, गुरु हा अत्यंत शुभ आणि लाभदायक ग्रह मानला जातो. सुमारे प्रत्येक १३ महिन्यांनी गुरु आपली रास बदलतो. यंदा गुरु अतिचारी अवस्थेत असल्यामुळे दोनदा राशी परिवर्तन करणार आहेत.
Healthy Lifestyle: निरोगी आरोग्य हवंय? प्रत्येक व्यक्तीने रोजच्या आहारात करा 'या' सुपरफूड्स समावेश!गुरुच्या या उच्च राशीत प्रवेशामुळे सर्व राशींवर प्रभाव पडेल, मात्र चार राशींना याचा सर्वाधिक फायदा होईल. पाहूया कोणत्या त्या राशी आणि त्यांच्यावर कसा परिणाम होईल.
वृषभ राशीगुरु तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या भावात प्रवेश करत आहेत. या भावात गुरुचा प्रवेश तुमच्यासाठी धनवृद्धी, प्रतिष्ठा आणि कामातील प्रगती घेऊन येईल. नवीन संधी मिळतील, रुकेलेले काम वेगाने पूर्ण होतील. प्रमोशनचे योगही प्रबळ आहेत. व्यावसायिकांना नफा वाढण्याची शक्यता आहे.
कर्क राशीगुरु तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजे पहिल्या भावात प्रवेश करत आहेत. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक सन्मान मिळेल. भाग्य तुमच्या पाठीशी असेल. नवी सुरुवात करायची असेल तर हा काळ उत्तम आहे. विवाहयोग्य व्यक्तींसाठी शुभ काळ आहे.
Travel Tips: मुलांसह विमान प्रवास करताना पालकांनी टाळाव्यात 'या' बेसिक चुका, जाणून घ्या स्मार्ट पॅरेंट्ससाठी टिप्स कन्या राशीगुरुचा गोचर तुमच्या लाभ भावात होत आहे. हा गोचर धनवृद्धी, संतानसुख आणि नवीन व्यावसायिक संधी घेऊन येईल. व्यावसायिक व्यवहारांमध्ये लाभ वाढेल. वाहन, घर किंवा संपत्तीशी संबंधित काही आनंददायी घटना घडू शकतात.
कुंभ राशीगुरु तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावात प्रवेश करत आहेत. सहावा भाव आव्हानांचा असला तरी गुरुचा प्रभाव तुम्हाला संघर्षातून यशाकडे नेईल. शत्रू आणि अडथळ्यांवर विजय मिळवाल. आरोग्य सुधारेल, आणि आत्मविश्वासात वाढ होईल.