00193
हर हर महादेव...
देवगड ः दीपावली पाडवा सणाला तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर दीपोत्सवाच्या तेजाने उजळून निघाले. हजारो दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा प्रत्येक कोपरा भक्तीभावाने न्हाऊन निघाला. लाटांच्या सुरांमध्ये आरतीचा स्वर अन् ‘हर हर महादेव’चा गजर मिसळताच सागरही जणू थक्क झाला. (छायाचित्र ः वैभव केळकर)