Nashik Crime : संतापजनक; रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत गैरवर्तन, रात्री परतताना चालकाचे कृत्य
Saam TV October 24, 2025 11:45 PM

नाशिक : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याची संतापजनक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आशा वर्करने दिवसभर ड्युटी केल्यानंतर रात्री परत येत असताना सहकारी असलेल्या रुग्णवाहिका चालकाकडून आशा वर्करचा लैंगिक छळ करण्यात आला. या घटनेने आयटक संघटना आक्रमक झाली आहे.  

राज्यात दररोज कुठे ना कुठे महिला, मुलींवरील अत्याचार, लैगिंक छळ होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशात नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात सदरची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत कानळदच्या आशा वर्करचा सहकारी असलेल्या ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ करण्यात आला आहे. सदरची घटना १८ ओक्टोम्बरच्या रात्री घडली आहे. 

Amravati : मनोरंजनाचा परवाना घेत भरवला जुगार अड्डा; पोलिसांची धाड टाकत कारवाई, १५ नागरिक ताब्यात

ड्युटी आटोपून परतताना चालकाचे कृत्य
दरम्यान १८ ऑक्टोबरला ड्युटी दरम्यान हा संतापजनक प्रकार घडला आहे. यात पीडित आशा वर्कर यांनी दिवसभर गर्भवती महिलांना रुग्णवाहिकेतून देवगाव, निफाड आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्याची सेवा बजावली. दरम्यान रात्री ड्युटी आटोपल्यानंतर रुग्णवाहिकेतूनच परत येण्यासाठी निघाल्या होत्या. परतताना ॲम्बुलन्स चालकाने सहकारी असलेल्या आशा वर्कर सोबत गैरवर्तन केल्याची तक्रार देण्यात आली आहे. 

Barshi : बार्शीतील व्यापाऱ्याची प्रामाणिकता; ज्वारीच्या पोत्यात सापडलेलं चार तोळे सोनं केलं परत

घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी 

या घटनेनंतर आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना आक्रमक झाली असून घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महिला आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी असून आशा वर्कर समाजाच्या आरोग्यरक्षक असून त्यांचा सन्मान आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. तर घटनेमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.