बीड : बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार धनंजय मुंडेच आहेत, असे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले.
भुजबळ यांनी मुंडे बहीण-भावांमध्ये हे विधान करून संघर्षाची ठिणगी टाकल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या वादामध्ये करुणा मुंडे यांनी उडी घेत गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत, असे म्हणत भुजबळांच्या सुरात सूर मिसळला आणि आता हा वाद अधिकच चिघळला आहे.
पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन या वादात मुंडे यांच्या समर्थनात उतरले आहेत. करुणा मुंडे कोण? त्या स्वतःला धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणत असतील तर पतीची अब्रू चव्हाट्यावर आणणे बंद करावे.
Beed OBC Melava: ओबीसी मेळाव्याला पंकजा मुंडे अनुपस्थित; स्टेजवर येताच भुजबळांनी शेरोशायरीतून सुनावलंगोपीनाथ मुंडे यांचा वारसा ठरवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील इतर वरिष्ठ सदस्य आहेत. त्यात करुणा यांनी बोलण्याची गरज नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले. प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक, राजकीय वारस असल्याचे ठणकावून सांगितले. मालमत्तेच्या वारसही पंकजा मुंडे आणि माझी बहीण याच आहेत.