स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या ग्राहकांना कळवले आहे की, त्यांच्या अनेक डिजिटल बँकिंग सेवा २५ ऑक्टोबर २०२५ रोजी शनिवारच्या पहाटे तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील. या काळात बँक सिस्टम मेंटेनन्स करेल. SBI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर घोषणा केली की UPI, IMPS, YONO, इंटरनेट बँकिंग, NEFT आणि RTGS यासारख्या अनेक सेवा २५ ऑक्टोबर रोजी पहाटे १:१० ते २:१० पर्यंत अंदाजे ६० मिनिटांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील. देखभाल पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा २:१० वाजता पुन्हा सुरू होतील.
बँकेने म्हटले आहे की, "नियोजित देखभालीमुळे, २५.१०.२०२५ रोजी पहाटे ०१:१० ते ०२:१० पर्यंत आमच्या UPI, IMPS, YONO, इंटरनेट बँकिंग, NEFT आणि RTGS सारख्या सेवा उपलब्ध राहणार नाहीत. या सेवा पहाटे ०२:१० पर्यंत पुनर्संचयित केल्या जातील. या काळात, SBI ग्राहकांना ATM आणि UPI Lite सेवा वापरण्याचा सल्ला देते. झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि तुमच्या संयमाबद्दल धन्यवाद."
Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात बंद; सेन्सेक्स 340 अंकांनी खाली, कोणते शेअर्स घसरले?एसबीआयने सुरुवातीला २४ ऑक्टोबर रोजी रात्री १२:१५ ते १:०० वाजेपर्यंत देखभाल करण्याची योजना आखली होती, परंतु नंतर ती एका दिवसाने पुढे ढकलून २५ ऑक्टोबर करण्यात आली. जर तुम्हाला २५ ऑक्टोबरच्या रात्री व्यवहारकरायचा असेल तर तुम्ही यूपीआय लाईट आणि एटीएम वापरू शकता. UPI Lite ही एक डिजिटल वॉलेट सेवा आहे जी तुम्हाला पिन न टाकता ₹१,००० पर्यंतचे छोटे व्यवहार त्वरित पूर्ण करण्याची परवानगी देते.
Mutual Fund New Rule: म्युच्युअल फंडचे नियम लवकरच बदलणार; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नियमBHIM SBI Pay अॅप उघडा आणि तुमच्या वॉलेटमध्ये पैसे भरण्यासाठी UPI Lite विभागात जा. पैसे लोड झाल्यानंतर ही सेवा सक्रिय होईल. वापरकर्ता भीम एसबीआय पे अॅपवरून कधीही ते निष्क्रिय करू शकतो. हे व्यवहार वॉलेटमधून असल्याने, स्टेटमेंटवर फक्त वॉलेट लोड एंट्री दिसते. देखभालीच्या कामात ग्राहकांनी घाबरू नये असे एसबीआयने म्हटले आहे; त्यांच्या बँकिंग सेवा लवकरच सामान्य होतील. या दरम्यान एटीएम आणि यूपीआय लाईट सेवा पूर्णपणे कार्यरत राहतील.