युरोप आणि मिडिल ईस्टनंतर आता आशिया खंडात युद्धाचा एक नवीन मोर्चा उघडला जाऊ शकतो. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये हे युद्ध भडकू शकतं. उत्तर कोरियाकडून सतत चिथावणीखोर कृती सुरु असते. दक्षिण कोरियाने त्याला प्रत्युत्तर देत उत्तर कोरियाच्या 20 सैनिकांवर गोळ्या झाडल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या या कारवाईने दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे शेजारी देश आहेत. त्यांच्यात भारत-पाकिस्तान सारखेच संबंध आहेत. उत्तर कोरियाला रशिया आणि चीन या देशांचा पाठिंबा आहे, तेच दक्षिण कोरियाला अमेरिका, जपानचा पाठिंबा आहे.
न्यूजवीकने दक्षिण कोरियातील स्थानिक मीडियाच्या हवाल्याने दिलेल्या वृ्त्तानुसार, किमचे सैनिक बफर झोनमध्ये
भूसुरुंगाची पेरणी करत होते. जेणेकरुन बफर झोनमध्ये उत्तर कोरियाचा विस्तार झाला पाहिजे. ही घटना गँगवॉन प्रांतातील चेओरवॉनची आहे.
आधी उत्तर कोरियाच्या आर्मीला इशारा दिला
दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी आधीउत्तर कोरियाच्याआर्मीला इशारा दिला. ते ऐकले नाहीत, तेव्हा फायरिंग केली. फायरिंग नंतर उत्तर कोरियाचे सैनिक मागे हटले. सीमापार करुन जवळपास 20 सैनिक भूसुरुंग पेरणीसाठी आले होते.
तीन पॉइंटमध्ये समजून घ्या, दोन्ही देशातील तणावाचं कारण
उत्तर कोरियाने अलीकडेच अनेक बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केली आहे. ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान दौऱ्याची घोषणा केली, त्यावेळी त्यांनी एक मिसाइल डागलेलं.
दक्षिण कोरियाने नेहमीच उत्तर कोरियावर अणवस्त्र संपवण्यासाठी दबाव टाकला आहे. किम जोंग उनने त्यांची ही इच्छा अनेकदा फेटाळून लावली आहे. किमच्या बहिणीने म्हटलय की, हे काहीही झालं तरी होणार नाही.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात APEC शिखर सम्मेलनात दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांची भेट घेऊ शकतात. उत्तर कोरियाने त्याआधी अमेरिकेला आपली शक्ती दाखवून दिली आहे.
आशिया खंडात अजून कुठे-कुठे युद्धाची स्थिती
आशिया खंडात पाकिस्तान-अफगाणिस्तान, चीन-तैवान आणि चीन-फिलिपींस या देशांमध्ये आधीपासूनच तणावाची स्थिती आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नुकताच सशस्त्र संघर्ष झाला.
तैवानवर चीन सुद्धा हल्ला करु शकतो. फिलीपींसच्या जहाजावर चीनने दोनवेळा हल्ला केलाय.