PMC Election 2025 : PMC निवडणुकीचा सस्पेन्स कायम! आरक्षणाची सोडत कधी? आयोगाने नियमावली दिली, पण तारीख गुलदस्त्यातच
esakal October 25, 2025 04:45 PM

पुणे : पुणे महापालिकेची प्रभा रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे याची नियमावली राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. पण ही सोडत कधी निघणार या हे मात्र अजून गुलदस्त्यातच ठेवलेले आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी प्रभाग निहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तसेच परवा रचना अंतिम झाल्यानंतर अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) प्रभाग निश्चित केले जातात. त्यासाठी सोडत काढली जाते.

आरक्षणाच्या सोडतीनंतर कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार?, घरातील पुरुष निवडणूक लढवणार की महिला निवडणूक लढवणार? हे चित्र स्पष्ट होते. त्यामुळे या सोडतीकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Crime News : पतीचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, विरोध करणाऱ्या पत्नीची गोळ्या घालून हत्या; १० वर्षांच्या मुलाने सांगितली हकीकत

दिवाळीपूर्वी प्रभाग रचना अंतिम झाली. त्यानंतर लगेच आरक्षणाची सोडत निघेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता दिवाळीनंतर ही आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पुणे महापालिकेला आरक्षणाची सोडत कशी काढावी याची नियमावली दिलेली आहे. त्यानुसार आरक्षण टाकण्यासाठी प्रक्रिया केली जाईल.

मात्र या नियमावली मध्ये कोणत्या दिवशी सोडत काढायची याबाबत स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे आणखीन काही दिवस आरक्षणाची सोडत करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना वाट बघावी लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.