आजकाल अनेकजण बाहेरगावी लवकर पोहचण्यासाठी जलद आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी विमानप्रवास करतात. विमानप्रवास हा अनेकदा सुखकर वाटतो. अशातच जेव्हा आपण विमानात बसण्यासाठी सर्वात आधी विमानतळावर जातो तेव्हा अनेक प्रोसेस फॉलो करून आपण विमानात बसतो. जेव्हा आपण विमानतळावर पोहोचतो तेव्हा सर्वात आधी तिकिट पासपोर्ट चेक करत असताना जेव्हा आपण एक्स-रे मशीनजवळ येतो तेव्हा एक आवाज येतो, “तुमचा लॅपटॉप बाहेर काढा!”
तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की योग्य पद्धतीने भरलेली बॅग आता त्यातून लॅपटॉप का बाहेर काढावा. हे क्षुल्लक वाटणारे काम वारंवार का केले जाते? तर, हा लेख विशेषतः तुमच्यासाठी आहे. ही प्रक्रिया कंटाळवाणी वाटत असली तरी, ही केवळ औपचारिकता नसून त्यामागे बॅगेतून लॅपटॉप बाहेर काढण्याचे वैज्ञानिक आणि सुरक्षित कारणे आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.
एक्स-रे स्कॅनर
जेव्हा तुमचा लॅपटॉप बॅगेत असतो तेव्हा तो एक्स-रे स्क्रीनवर एका मोठ्या दाट भिंतीसारखा दिसतो. लॅपटॉपमध्ये असलेली ही दाट बॅटरी आणि धातूचे आवरण असल्याने चार्जर, पेन किंवा नाणी यासारख्या लहान वस्तू पूर्णपणे लपलेले जाते. स्कॅनवर अशा काही गोष्टी लॅपटॉप असल्याने दिसत नाही.
सुरक्षा अधिकाऱ्यांना अनेकदा एक्स-रे स्क्रीनवर भितींसारखी दिसणारी ही सावली संशयास्पद वाटते. म्हणूनच तुमचा लॅपटॉप काढून टाकल्याने ही सावली निघून जाते, ज्यामुळे स्कॅनरला बॅगेत असलेल्या इतर गोष्टी स्पष्ट दिसतात आणि तुमची बॅग मॅन्युअल तपासणीसाठी थांबवली जाण्याची शक्यता कमी होते.
लॅपटॉपच्या साहाय्याने वस्तूंची तस्करी
बॅटरीच्या धोक्यांव्यतिरिक्त लॅपटॉपचा गैरवापर देखील अनेकदा करण्यात आलेला आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये तस्करांनी ड्रग्ज किंवा इतर धोकादायक वस्तू लपविण्यासाठी लॅपटॉपचे आवरण पोकळ केले आहे किंवा भाग बदलून त्यात वस्तुंची तस्करी केलेली आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडल्याने देशांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. यागोष्टी लक्षात घेऊन जगभरात विमानतळावरील सुरक्षा नियम कडक झाले आहेत. लॅपटॉप वेगवेगळ्या ट्रेमध्ये ठेवून, अधिकारी खात्री करतात की आत कोणतीही संशयास्पद वस्तू लपलेली आहे की नाही.
लॅपटॉप बॅटरी सेंसिटिव्ह असते
लॅपटॉपमध्ये पॉवरफूल लिथियम-आयन बॅटरी असते आणि या बॅटऱ्या खूप सेंसिटिव्ह असतात आणि जर त्या खराब झाल्या किंवा जास्त गरम झाल्या तर बागेत आग लागण्याचा धोका निर्माण करू शकतात.
जेव्हा लॅपटॉप स्वतंत्रपणे स्कॅन केला जातो तेव्हा अधिकारी बॅटरी खराब झाल्याची कोणतीही चिन्हे काळजीपूर्वक तपासले जाते. हा एक सुरक्षा उपाय आहे जो तुमचा लॅपटॉप बॅगमध्ये असल्यास चेक करणे कठीण होते.
नियम जागतिक स्तरावर लागू होतात
विमानतळाचे नियम अनियंत्रित नसतात. ते जागतिक विमान वाहतूक संघटनांनी प्रत्यक्ष घटनांवर आधारित स्थापित केले आहेत. उदाहरणार्थ, 2022 मध्ये व्हर्जिनियामधील विमानतळावर लॅपटॉपच्या आवरणात एक दुधारी चाकू सापडला. अशा घटनांनंतर जगभरातील एजन्सींनी लॅपटॉपची स्वतंत्र तपासणी करण्याचे नियम अधोरेखित केली आहे. त्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी हे नियम सारखेच आहेत. ज्याचे पालन तुम्ही केले पाहिजेच.