नाणीज विद्यालयात गोउत्पादन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २४ ः नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेजमधील ११वी व १२वीमधील विद्यार्थ्यांसाठी गोउत्पादन कार्यशाळा घेण्यात आली. त्यांना हॅपी इको व्हिलेजच्या दीपाली प्रणीत यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेवेळी प्रणीत तारी, प्रिया लिंगायत, सूर्यकांत सरदेसाई, दीपक रेडीज या गोपालकांनीही मार्गदर्शन केले. या वेळी कॉलेजच्या प्राचार्या रूपाली सावंतदेसाई, कॉलेज विभागप्रमुख प्रमोद वाघरे, कॉलेजचे सर्व शिक्षक व अकरावी-बारावीतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशांत ठाकूर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर अकरावीतील विद्यार्थिनींनी गाईवर आधारित गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम पांचाळ याने केले. प्रास्ताविक प्रमोद वाघरे यांनी केले. या प्रसंगी प्रणीत यांनी गाईच्या शरीररचनेची विशेषतः उपस्थितांना सांगितली. त्याचबरोबर गाईचे संवर्धन, पंचगव्य गाईच्या प्रादेशिक प्रजाती व लसीकरणाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.