Bollywood Unknown Facts : 2013 हे वर्षं बॉलिवूड साठी खास होतं कारण नुकतंच भारतीय सिनेमाला 100 वर्षं पूर्ण झाली होती. त्यावर्षी अनेक सुंदर सिनेमे रिलीज झाले. याचदरम्यान एक सिनेमा रिलीज झाला ज्याने 500 कोटीची कमाई करत इतिहास रचला. कोणता होता सिनेमा जाणून घेऊया.
20 डिसेंबर ला हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा होता धूम 3. आमिर खान, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. या सिनेमाने जागतिक स्तरावर 500 करोड रुपयांची कमाई पहिल्यांदा केली. ज्याने एक वेगळा इतिहास रचला.
विजय आचार्य यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाचं बजेट त्यावेळी 100 -175 करोड होतं. या सिनेमाने भारतात 284.27 करोड कमावले होते. पण निर्मात्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी कमाई या सिनेमाने भारतात केली.
अगदी आमिर खाननेही याबद्दल उघड नाराजी नंतर दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. कारण आधीच्या दोन्ही धुमच्या तुलनेत हा सिनेमा अयशस्वी ठरला होता.अनेकांना या सिनेमाचं कथानक पटलं नव्हतं. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी सिनेमावर उघड टीका केली होती.
"सिनेमाच्या कथानकात बरीच त्रुटी होत्या. ज्याविषयी मी आदित्य चोप्राशी बोललो होतो. माझ्या मते जो महत्त्वाचा भाग होता सिनेमाच्या कथेचा तो दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी काढून टाकला. त्यामुळे सिनेमातील इंटरेस्ट संपला." असं आमिरने द बॉम्बे जर्नीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
"मला लाख रुपये दिले तरी परत मिळणार नाही.." वंदना गुप्तेंकडे जयपूरच्या राजघराण्याची ही खास वस्तू !