समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्यातील सावरखेडा गावातील २५ वर्षीय तरुणाने भाऊबीजेच्या रात्री आपल्या शेताच्या बांधावर गळफास लावून आत्महत्या (Wardha Crime) केली. हर्षल राऊत मृताचे नाव असे असून तो शेतकरी नथ्थुजी राऊत यांचा मुलगा आहे.
माहितीनुसार, गुरुवारी (ता. २३) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हर्षलने जेवण केल्यानंतर शेताकडे जात असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ लोटल्यानंतरही तो परतला नाही. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोध घेतला असता हर्षल शेतातील बांधावर झाडाला अंगातील टी-शर्ट बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
Nanded Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध, हात-पाय बांधून नांदेडच्या तरुणाला बेदम मारहाण; अंगाला गरम चटके देऊन केला छळमाहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात हलविला. मृत हर्षल हा घरातील कर्ता मुलगा असून शेतीची जबाबदारी त्याच्यावर होती. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
त्यातच आजारी वडिलांची देखभाल, आर्थिक संकट आणि स्वतःच्या लग्नासाठी पैसे नसल्याने तो मानसिक तणावाखाली होता. या सर्व परिस्थितीतून त्रस्त होऊन त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीवरून पुढे आले आहे. ऐन भाऊबीजेच्या रात्री हर्षलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने सावरखेडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.