पिंपरी : पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खून प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नकुल यांचे भाऊ तुषार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपला भाऊ वहिनी चैतालीला वारंवार दारू पिऊ नकोस, दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरत जाऊ नकोस, लोकांकडून कर्ज काढू नकोस, असे सांगायचा.
या रागातून वाहिनीने आपल्या भावाला जिवे मारले. तुषार भोईर (रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांच्या फिर्यादीतून इतरही बाबी समोर आल्या आहेत. दुसरीकडे पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने खून केल्याची कबुली चैतालीने पोलिसांना दिली.
चिंचवड पोलिसांनी चैतालीला अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले होते, मात्र चौकशीत संबंधित व्यक्ती खुनात सामील नसल्याने आढळले. त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले.
Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले व्हिसेरा राखून ठेवलादरम्यान, नकुल यांना जिवे मारणे एकट्या महिलेला शक्य नाही, अशीही चर्चा परिसरात होती. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर डॉक्टरांनी नकुल यांचा व्हिसेरा राखून ठेवला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर अधिक स्पष्टता येईल, असे पोलिसांनी सांगितले.