“सलमानसोबत पुन्हा काम नाही!” 'अंतिम'च्या सेटवर झाला होता वाद! महेश मांजरेकरांनी उघड केली सलमान खानची खरी बाजू!
esakal October 26, 2025 06:45 PM

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर हे दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात कायम विशेष स्थान राखून आहेत. 'वास्तव', 'नटसम्राट', 'दे धक्का 'पासून ते 'अंतिम'पर्यंत त्यांनी अनेक प्रभावी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.

हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. मात्र, अलीकडेच त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सलमान खानसोबत पुन्हा काम करण्याची शक्यता त्यांनी स्पष्टपणे नाकारली आहे.

मुलाखतीत मांजरेकर म्हणाले, मी सलमानसोबत 'अंतिम' हा चित्रपट केला; पण आता जर विचाराल त्याच्यासोबत पुन्हा काम करशील का, तर माझे उत्तर 'नाही' असे असेल. तसंच पुढे बोलताना मांजरेकर म्हणाले की, 'सलमानला वाटते की त्याला चित्रपट कळतो. कारण त्याचे वडील लेखक आहेत; पण मी थोडासा ठाम स्वभावाचा आहे.

'अंतिम'च्या चित्रीकरणादरम्यान त्याच्या उशिरा येण्यावरून थोडा वाद झाला होता', सलमान खान आणि आयुष शर्मा अभिनीत 'अंतिम' हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. मराठीतील सुपरहिट चित्रपट 'मुळशी पॅटर्न'चा हा हिंदी रिमेक होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने मध्यम कामगिरी केली.

दरम्यान, महेश मांजरेकर सध्या आगामी चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, सिद्धार्थ जाधव, मंगेश देसाई आणि सयाजी शिंद कलाकार झळकणार असून, तो ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय.

"मी पुन्हा सीन करणार नाही" जेव्हा शुटिंगवेळी शाहरुखवर भडकले सतीश शाह ; 'हे' होतं कारण !
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.