गर्भपातानंतर 'या' गोष्टी करू नका, नाहीतर वाढेल त्रास!
esakal October 27, 2025 03:45 PM
गर्भपात

गर्भपात हा कोणत्याही महिलेसाठी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही मोठा आघात असतो.

शरीरात होणारे बदल

या काळात शरीरात होणारे बदल, वेदना आणि थकवा यामुळे योग्य विश्रांती व काळजी घेणं आवश्यक असतं.

नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या

गर्भपातानंतर रक्तस्त्राव, वेदना किंवा ताप असल्यास स्वतः औषधं घेणं टाळा. आणि नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या

स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका

या काळात संक्रमणाचा धोका अधिक असतो. टॅम्पन वापरू नका; त्याऐवजी स्वच्छ सॅनिटरी पॅड वापरा आणि दर ३-४ तासांनी बदलत राहा.

लैंगिक संबंधांना वेळ द्या

गर्भाशय अजूनही संवेदनशील असतो. त्यामुळे पूर्णपणे बरे झाल्यानंतरच आणि डॉक्टरांच्या परवानगीनेच संबंध ठेवावेत. लवकर संबंध ठेवल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.

जड वस्तू उचलणे टाळा

गर्भपातानंतर शरीर कमकुवत असतं. या काळात जड वस्तू उचलणे, धावपळ किंवा जोरदार व्यायाम करणं टाळा.

पौष्टिक आहार घ्या

रक्तस्त्रावामुळे शरीरात लोह आणि इतर पोषक घटकांची कमतरता होते. हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळं, सुकामेवा आणि दूध यांचा समावेश आहारात करा. मसालेदार आणि तेलकट अन्न टाळा.

धूम्रपान व मद्यपान टाळा

या सवयी शरीराच्या पुनर्प्राप्तीवर परिणाम करतात आणि हार्मोनल संतुलन बिघडवतात. या काळात पूर्णतः दूर राहणं चांगलं.

रेशीम पैठणी खरेदी करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.