फळे खरेदी करताना आपण अनेकदा असं पाहिलं असेल की, काही फळांवर स्टिकर लावलेले असतात. फळे खरेदी कराताना आपण फक्त फळं चांगली आहेत का? चांगली टिकणारी आहेत का? हे पाहतो. पण त्या फळावर असलेल्या स्टिकरकडे मात्र आपण दूर्लक्ष करतो. त्यावर काहीतरी कोडही असतो. पण हे छोटे स्टिकर्स फक्त ब्रँडिंग किंवा सजावटीसाठी नसतात. तर या स्टिकर्समध्ये PLU एक विशेष कोड असतो.
फळांची गुणवत्ता ओळखण्यास मदत होऊ शकते
हा कोड ग्राहकांना फळांच्या लागवडीच्या पद्धतीबद्दल माहिती देतो. ज्याचा थेट तुमच्या आरोग्याशी असतो. एवढंच नाही तर हे कोड तुम्हाला फळांची गुणवत्ता ओळखण्यास मदत करू शकतात. उच्च दर्जाचे फळ खाणे हे चांगल्या आरोग्याशी जोडलेले असते. त्यामुळे त्या स्टिकरकडे दूर्लक्ष न करता त्याच्या मदतीने आपण चांगली फळे ओळखू शकतो. त्यामुळे फळांवरील कोडचा किंवा त्या स्टिकरचा नेमका अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.
पीएलयू कोडचा आरोग्याशी काय संबंध आहे?
PLU कोड सहसा 4 किंवा 5 अंकांचा असत. यातील पहिला अंक कोणत्या प्रकारचे फळ पिकवले जाते हे ठरवतो. हा कोड वाचून, तुम्ही सांगू शकता की फळ सेंद्रिय आहे, रासायनिक प्रक्रिया केलेले आहे की अनुवांशिकरित्या सुधारित आहे.
फळांवरील स्टिकरचा अर्थ काय आहे?
स्टिकरवर फक्त 5 अंकी संख्या असेल तर…
जर फळावरील स्टिकरवर ‘9’ ने सुरू होणारा 5 अंकी क्रमांक असेल, तर याचा अर्थ असा की फळ पूर्णपणे सेंद्रिय आहे. ते कोणत्याही रासायनिक कीटकनाशके, खते किंवा अनुवांशिक बदलाशिवाय नैसर्गिकरित्या पिकवले गेले आहे.
स्टिकरवर फक्त 4 अंकी संख्या असेल तर….
जर स्टिकरवर फक्त 4 अंकी संख्या असेल, तर याचा अर्थ फळावर कीटकनाशके आणि रसायने वापरली गेली आहेत. ही फळे अनेकदा स्वस्त असतात परंतु कमी आरोग्यदायी असतात कारण ती रसायनांनी पिकवलेली असतात.
फळे खरेदी करताना ही काळजी घ्या:
तुम्हाला फळांवरील हा कोडबद्दल समजलं असेलच. तेव्हा आता फळे खरेदी करताना हे लक्षात ठेवा. शक्य असेल तेव्हा, 5 अंकी क्रमांक ‘9’ ने सुरू होत असेल तर सेंद्रिय फळे खरेदी करा. फळ सेंद्रिय असो वा प्रक्रिया केलेले , कोणतेही फळ खाताना फक्त ते स्वच्छ धुवून खा. त्यावरील बॅक्टेरिया निघून जाणे महत्त्वाचे आहे. तसेच, हंगामी फळे खरेदी करण्याचा प्रयत्न करा, कारण ती अधिक ताजी असतात.